हा पठ्ठ्या नसता तर तो दिल्लीत गेला नसता, गुलाबराव पाटलांचा खासदारांना टोला

खासदाराने येथे ओरडण्यापेक्षा जर दिल्लीत ओरडले असते आणि कोळसा आणला असता तर त्यांचा सत्कार केला असता.
gulabrao patil
gulabrao patilgulabrao patil
Updated on

जळगाव : सध्या राज्यात भारनियमनाचा मुद्दा गाजत आहे. कोळसा टंचाईमुळे राज्यात भारनियमन करावे लागत आहे. केंद्रीय कोळसा राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी कोळसा टंचाईचे खापर महाविकास आघाडी सरकारवर फोडले आहे. बाहेर देशातून कोळसा आणावा, असा सल्ला त्यांनी ठाकरे सरकारला दिला आहे. भाजपचे खासदार उन्मेश पाटील यांनी जळगाव जिल्ह्यातील भारनियमनावरुन पालकमंत्री तथा शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली होती. या टीकेला पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, हा पठ्ठ्या नसता तर तो दिल्लीत गेला नसता, खासदार झाला नसता. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर गुलाबराव पाटील आज गुरुवारी (ता.१४) प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

gulabrao patil
औरंगाबादमधील राम नवमी मिरवणुकीचा Viral Video; मशिदीजवळून जाताना 'भाईचारा'

जळगावमधील (Jalgaon) भारनियमन बंद करावे यासाठी भाजपने महाआक्रोश मोर्चा काढला होता. या मोर्चात उन्मेश पाटील (Unmesh Patil) म्हणाले होते, की गुलाबराव पाटील यांचे जिल्ह्याकडे लक्ष नाही, पालकमंत्री झोपा काढतायत का ?, असा आरोप त्यांनी गुलाबराव यांच्यावर केला होता. या टीकेला गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. केंद्राकडून कोळसा मिळत नसल्याने राज्यात विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे भारनियमन केले जात आहे.

gulabrao patil
काळजी, दगदग नको करु ! तब्येतीला जप, पंकजा यांचा भाऊ धनंजय मुंडेंना सल्ला

केंद्र सरकारला मुबलका कोळसा पुरवण्यास सांगावे, समस्या आपोआपच सुटेल, असा सल्ला त्यांनी उन्मेश पाटील यांना दिला. भाजपने मोर्चा काढला, खासदाराने येथे ओरडण्यापेक्षा जर दिल्लीत ओरडले असते आणि कोळसा आणला असता तर त्यांचा सत्कार केला असता. जखम डोक्याला अन् मलम मांडीला असे भाजपचे (BJP) चुकीचे वागणे सुरु असल्याचा आरोप गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()