संजय राऊतांना वेळेवर चुना लावीन : गुलाबराव पाटलांचा टोला

Gulabrao Patil on Sanjay Raut
Gulabrao Patil on Sanjay Rautesakal
Updated on

जळगाव : पानाला चुना कसा लावतात, हे अद्याप संजय राऊत यांना माहीत नाही. मात्र, वेळ येईल तेव्हा त्यांना मी चुना लावीन, असा सणसणीत टोला शिवसेनेचे (Shiv sena) बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे. (Gulabrao Patil on Sanjay Raut)

राज्याचे मंत्री व शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. टपरीवरील आमदाराला पुन्हा पान लावण्यासाठी टपरीवर बसावे लागले, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली होती. संपूर्ण महाराष्टात ही टीका गाजली होती.

गुवहाटी येथे हॉटेलमध्ये बुधवारी (ता. २९) सर्व बंडखोर आमदारांची बैठक झाली. त्या बैठकीची क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली. या बैठकीत बोलताना गुलाबराव पाटील यांनी खासदार राऊत यांना जबरदस्त टोला लगावला. ते म्हणाले, की संजय राऊत मला पुन्हा पानटपरीवर चुना लावत बसेल, असे म्हणतात. मात्र, पानाला चुना कसा लावतात, त्यांना माहीत आहे का? वेळ आल्यावर मी त्यांना नक्की चुना लावीन.

उद्धव ठाकरे पवारांना सोडत नाहीत
आपल्यासोबतचे ४० व अपक्ष आमदार सभागृहात डिबेट करण्यासाठी त्यांना पुरेसे आहोत, असे मत व्यक्त करून गुलाबराव पाटील म्हणाले, की उद्धव ठाकरे यांना आपण याबाबत सर्व सांगितले. मात्र, त्यांनी ऐकलेच नाही. त्यांनी आपल्याला सोडले, ‘वर्षा’ सोडले. मात्र, ते शरद पवार यांना सोडण्यास तयार नाहीत.

Gulabrao Patil on Sanjay Raut
जळगाव : रखडलेला उड्डाणपूल, चालकाची डुलकी अन्‌ मृत्यूचा वेग

आमचाही त्याग आहे
आम्हाला उद्धव ठाकरे यांच्यामुळे मंत्रिपद मिळाले, हे निश्‍चित आहे, असे मत व्यक्त करून ते म्हणाले, की आम्हीही शिवसेनेसाठी कार्य केले आहे. कठीण परिस्थितीत आम्ही घरावर तुळशीपत्र ठेवूनही कार्य केले आहे. त्यामुळे मंत्रिपद मिळण्यात आमच्या कामाचाही सहभाग निश्‍चित आहे. आम्ही काही केवळ आयत्या बिळावर नागोबा नाहीत. त्यामुळे आगामी काळासाठी आपण सर्व एकत्र राहून लढाई लढणार आहोत. एकनाथ शिंदे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया, एवढीच आपण देवासमोर प्रार्थना करीत आहोत.

Gulabrao Patil on Sanjay Raut
मासे पकडण्यास गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.