जळगाव : नागवेल पानमळा शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन, म्हणून अनुदान देण्यासाठी ‘डीपीडीसी’मध्ये भरीव तरतूद केली जाईल. नीलगायी, रोही व लोधडे या वन्य प्राण्यांपासून पिकांचे नुकसान किंवा हानी होऊ नये, यासाठी सौरकुंपण मशीनसाठी जास्तीत जास्त निधीची या वर्षी तरतूद करणार आहे.
वीज उपकेंद्राला लवकरच मंजुरी मिळणार असून, वीज समस्या सुटण्यासाठी मोठा दिलासा मिळणार आहे, असा विश्वास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. (Gulabrao Patil statement Approval for power substation in Shirsoli soon jalgaon news)
शिरसोली येथील वसंतदादा चौकात फिल्टर प्लांटसह पाणीपुरवठा योजना, विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते.
बजेट अंतर्गत शिरसोली ते धानवड तांडा रस्त्याच्या कामासाठी ७० लाख, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत प्रजिमा ३९ ते शिरसोली ग्रामीण महामार्ग ५४ रस्ता व त्यावरील लहान मोऱ्यांसह डांबरीकरण व मजबुतीकरण करण्यासाठी पाच कोटी ३० लाखांचा निधी मंजूर झाला असून, लवकरच कामाला सुरवात होणार आहे.
‘डीपीडीसी’च्या माध्यमातून वन विभागातर्फे नवड व शिरसोली येथील ३० शेतकऱ्यांना सौरकुंपण साहित्यवाटप पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते झाले.
आयोजकांनी गावाच्या प्रमुख मार्गावर दुतर्फा वीजखांब बसविण्याची, तसेच रेल्वेस्थानक ते श्री बैठक हॉलपर्यंत रस्ता करण्याची मागणी केली. पालकमंत्री पाटील यांनी तत्काळ त्या कामांना मंजुरी दिली.
हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?
शिरसोलीपासून आठ किलोमीटरची मोठी पाइपलाइन, गावांतर्गत गावठाणसह पाइपलाइन करणे, ४ लाख ५० हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी, दत्तनगरमध्ये फिल्टर प्लांट व इतर कामे करण्यात येणार आहेत. या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन, शिरसोली प्र. न. येथील रस्ताचे डांबरीकरण कामाचे भूमिपूजन झाले.
उपवनसरंक्षक विवेक घोसिंग, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नीलेश पाटील, उपजिल्हा प्रमुख नरेंद्र सोनवणे, तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश आस्वार, धनुबाई आंबटकर, पवन सोनवणे, नंदलाल पाटील, अनिल भोळे, सरपंच हिलाल भिल, उपसरपंच गौतम खैरे, ग्रामविकास अधिकारी जयपाल चिंचोरे आदी उपस्थित होते. विजय पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.