Gulabrao Patil News: अभ्यासात कच्चा, कलेत पक्का होतो... म्हणूनच राजकारणात! गुलाबराव पाटील

Gulabrao Patil
Gulabrao Patilesakal
Updated on

Gulabrao Patil News : महाविद्यालयात शिकताना मी अभ्यासात पक्का नव्हतो; पण कलेत पुढे होतो. त्या कलेचा फायदा राजकारणात झाला.

तुम्ही किती शिकलात, यापेक्षा तुमची मांडणी कशी आहे, हे आज महत्त्वाचे ठरते, असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. (Gulabrao Patil statement at NMU yuvarang mahotsav opening jalgaon)

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग आणि केसीई संस्थेचे मूळजी जेठा महाविद्यालय यांच्यातर्फे युवारंग युवक महोत्सवाचे उद्‌घाटन रविवारी (ता. ८) शानदार सोहळ्यात पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते झाले.

त्या वेळी ते बोलत होते. कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्‍वरी अध्यक्षस्थानी होते. उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, विद्यापीठाच्या सल्लागार परिषदेचे अध्यक्ष अशोक जैन प्रमुख पाहुणे होते.

मंत्री पाटील म्हणाले, की अशा प्रकारच्या युवक महोत्सवांतूनच उद्याचे कलावंत घडणार आहेत, जे राज्यात आपला स्वतंत्र ठसा उमटवतील. महोत्सवात मुलींचा सहभाग वाढल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

कोविडनंतरचा उत्सव : कुलगुरू

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रा. माहेश्‍वरी म्हणाले, की कोविडनंतर यंदा प्रथमच पहिल्या सत्रात युवक महोत्सव होत आहे. जेणेकरून यातील विद्यार्थ्यांना इंद्रधनुष्य स्पर्धेत सहभाग घेता येईल.

आता तर नव्या शैक्षणिक धोरणात मुख्य विषयाबरोबर आवडीचा विषय निवडण्याची मुभा देण्यात आली आहे. माहिती व ज्ञान, जोडणी आणि नाते व आनंद याबद्दल तरुण पिढीत काही गोंधळ आहे, असे सांगून यातील फरक त्यांनी विशद केला.

श्री. रस्तोगी यांनी, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विद्यार्थ्यांनी हट्ट धरावा, असे आवाहन करून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांना सर्वव्यापी व परिपूर्ण शिक्षण मिळेल, असे मत व्यक्त केले.

अशोक जैन यांनी करिअर घडविण्यासाठी कला हाही मार्ग असल्याचे सांगून या क्षेत्रात प्रावीण्य प्राप्त करून वाटचाल करा, अडचण आल्यास सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

Gulabrao Patil
Nashik News: मनमाडसाठी MIDCला मान्यता; उद्योगमंत्री सामंतांच्या अध्यक्षतेखाली हाय पॉवर कमिटीच्या बैठकीत निर्णय

गीतेतील तत्त्व पाळा : बेंडाळे

स्वागतपर मनोगतात नंदकुमार बेंडाळे म्हणाले, की शैक्षणिक क्षेत्रात केसीई संस्था ऋषितुल्य म्हणून काम करीत आहे.

नव्या पिढीने भगवद्‌गीतेतील तत्त्व उराशी बाळगावे. महोत्सवाचे कार्याध्यक्ष व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेंद्र नन्नवरे म्हणाले, की देशाने विकासात आघाडी घेतली असून, चांद्रयान मोहीम यशस्वी झाली.

आशियाई स्पर्धेत १०० पेक्षा अधिक पदके भारताने मिळविली. विकसित भारतासाठी पंचप्रण देण्यात आले आहेत. हा वारसा विद्यार्थ्यांनी जोपासावा. महोत्सवाचे संयोजक प्रा. जयेंद्र लेकुरवाळे यांनी विद्यापीठाची भूमिका विशद केली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यापीठ कटिबद्ध आहे.

त्याचाच एक भाग म्हणून लोककला महोत्सव, विद्यार्थी साहित्य संमेलन व दिव्यांग कला महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल, अशी माहिती दिली. सुरवातीला राष्ट्रगीतानंतर प्रा. कपिल शिंगाणे आणि विद्यार्थ्यांनी राज्यगीत सादर केले.

डॉ. अखिलेश शर्मा यांनी ईशस्तवन केले. विद्यार्थिनी दीप्ती पाटील हिने छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर करून वातावरणात स्फुरण चढविले. डॉ. भाग्यश्री भलवतकर व डॉ. योगेश महाले यांनी सूत्रसंचालन केले.

यांची होती उपस्थिती

मंचावर संस्थेचे अध्यक्ष व व्यवस्थापन परिषदेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, आमदार सुरेश‍ भोळे, प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, महोत्सवाचे कार्याध्यक्ष राजेंद्र नन्नवरे, सहसंचालक प्रा. संतोष चव्हाण, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. शिवाजी पाटील,

प्रा. साहेबराव भूकन, प्राचार्य संजय सुराणा, प्रा. सुरेखा पालवे, प्रा. महेंद्र रघुवंशी, डॉ. पवित्रा पाटील, ॲड. अमोल पाटील, नितीन झाल्टे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, संस्थेचे कोशाध्यक्ष डी. टी. पाटील, विद्यार्थी विकास संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे,

प्राचार्य एस. एन. भारंबे, राज्य सुकाणू समितीचे सदस्य अनिल राव, भरत अमळकर, प्र. अधिष्ठाता प्राचार्य एस. एस. राजपूत, प्राचार्य ए. पी. खैरनार, प्राचार्य अशोक राणे, ॲड. प्रमोद पाटील, भालचंद्र पाटील, डॉ. हर्षवर्धन जावळे, ॲड. प्रवीणचंद्र जंगले, रूपेश चिरमाडे, संजय प्रभूदेसाई, सीए रवींद्र पाटील,

प्रा. योगेश पाटील, डॉ. जुगलकिशोर दुबे, डॉ. मनोज महाजन आदी व्यासपीठावर होते. अधिसभा सदस्य प्राचार्य बी. युवाकुमार रेड्डी, प्राचार्य सुनील पाटील, प्राचार्य आर. आर. अत्तरदे, प्राचार्य जे. बी. अंजने, दीपक पाटील,

विष्णू भंगाळे, अमोल मराठे, अमोल सोनवणे, प्रा. संदीप नेरकर, प्रा. गजानन पाटील, स्वप्नाली काळे, सुरेखा पाटील, ऋषीकेश चित्तम, रासेयो संचालक प्रा. सचिन नांद्रे, डॉ. सी. पी. लभाणे, प्रा. पी. आर. चौधरी, एस. आर. गोहिल आदींसह शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Gulabrao Patil
Jalgaon Rain Update: ऑगस्ट शतकातील सर्वात कोरडा महिना! जिल्ह्यात 92 टक्के पाऊस, 8 टक्क्यांची तूट

मंत्री चंद्रकांत पाटलांच्या शुभेच्छा

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुभेच्छा संदेश दिलेली ध्वनिफीत दाखविण्यात आली. या महोत्सवातून प्रशांत दळवी, अश्‍विनी भावे यांसारखे लेखक, कलावंत घडले आहेत. त्यामुळे महोत्सवाचा फायदा घ्या. छत्रपती शिवरायांचे विचार तरुण पिढीपर्यंत पोहोचते करा, असे आवाहन या संदेशात त्यांनी केले.

गिरीश महाजनांकडून संदेश

ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी पाठविलेल्या संदेशाचे वाचन व्यवस्थापन परिषदेचे सदस्य अॅड. अमोल पाटील यांनी केले. युवक महोत्सवाला शुभेच्छा देताना श्री. महाजन यांनी निर्व्यसनी राहा व देशाच्या विचारासाठी जगा, असे आवाहन तरुणाईला केले.

रिश्‍ते में तो हम तुम्हारें...

विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. माहेश्‍वरी यांनी आपल्या भाषणाची सुरवात शहंशाह चित्रपटातील अमिताभ बच्चन यांच्या विख्यात संवादाने केली.

‘रिश्‍ते में तो हम तुम्हारे व्हाइस चांसलर लगते है... नाम है विजय...’ असा डॉयलॉग मारत भाषण केले. त्याच्या या संवादाला विद्यार्थ्यांनी दाद दिली.

Gulabrao Patil
Nanadurbar Agriculture News : शेतकरी धास्तावला; पपईवर डाऊनी, मोझॅकचा प्रादुर्भाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.