Mother Milk Bank: जिल्हा रुग्णालयात ‘मदर मिल्क बँक’ स्थापणार : पालकमंत्री पाटील

Guardian Minister Gulabrao Patil at the inauguration of the latest surgical theater in the Government Medical College and Hospital
Guardian Minister Gulabrao Patil at the inauguration of the latest surgical theater in the Government Medical College and Hospitalesakal
Updated on

Mother Milk Bank : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (जीएमसी) विविध ग्रामीण रुग्णालयांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आपण आरोग्य क्षेत्रासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे.

आता जिल्हा रुग्णालयात नवजात शिशूंसाठी ‘मदर मिल्क बँक’ स्थापन करू, अशी घोषणा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली.

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) अद्ययावत शस्त्रक्रियागृहाचे शनिवारी (ता. २) उद्‍घाटन झाले. त्या वेळी ते बोलत होते.

ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन, आमदार राजूमामा भोळे, अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर प्रमुख पाहुणे होते. (gulabrao patil statement Mother Milk Bank will be set up in district hospital jalgaon)

पालकमंत्री पाटील म्हणाले, की, डॉक्टर परमेश्वरासमान असून, त्यांच्या कौशल्याची उपलब्धता जिल्हावासीयांसाठी करून दिली जात आहे. डीपीडीसी माध्यमातून गेल्या पाच वर्षांत सामान्य रुग्णालयासाठी निधी उपलब्ध केला आहे.

माता व बालसंगोपनसाठी ३५ कोटी, तर मोहाडी रुग्णालयाला ७५ कोटी मंजूर केले आहे. योग्य वेळी दूध न मिळाल्याने नवजात बालकांचे मृत्यू होतात.

अशा बालकांना वेळेवर दूध मिळावे म्हणून जिल्हा रुग्णालयात डीपीडीसी माध्यमातून ‘मदर मिल्क बँक’ स्थापन करणार आहे. आरोग्य विभागासाठी निधी कमी पडू देणार नाही.

सकाळी चार स्वयंचलित शस्त्रक्रिया खोल्या असलेल्या सुसज्ज, अद्ययावत शस्त्रक्रियागृहाचे उद्‍घाटन मणकारोगतज्ज्ञ डॉ. शेखर भोजराज यांच्या हस्ते झाले. ओपीडीतील कक्ष क्रमांक ११४ बी येथे मणकारोग तपासणी कक्षाचे उद्‍घाटन पालकमंत्री पाटील, मंत्री महाजन यांच्या हस्ते झाले.

जिल्हा नियोजन भवन येथे जीएससी, मुंबई येथील स्पाइन फाउंडेशन, निरामय सेवा फाउंडेशन, जीएम फाउंडेशन यांच्यातर्फे आरोग्य क्षेत्रातील विविध वर्गांचे मणक्याचे आजारांविषयी प्रशिक्षण घेण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Guardian Minister Gulabrao Patil at the inauguration of the latest surgical theater in the Government Medical College and Hospital
Nashik: येवल्यातील क्रांतीस्तंभाला मिळणार झळाळी! दराडे बंधूच्या पुढाकाराने सुशोभीकरणासह रस्ता कामाला निधी

पालकमंत्री पाटील, मंत्री गिरीश महाजन, आमदार भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जि. प. सीईओ अंकित, मनपा आयुक्त विद्या गायकवाड, डॉ. भोजराज, डॉ. अर्चना भोजराज, अधिष्ठाता डॉ. ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. सचिन भायेकर उपस्थित होते.

अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. जोतीकुमार बागूल यांनी आभार मानले.

डॉ. भोजराज रुग्णांचे आधारवड

मंत्री महाजन म्हणाले, की डॉक्टरांचे कार्य हे परमेश्वरी कार्य आहे. त्यांच्या कौशल्यामुळे जनसामान्यांना मोठा आधार मिळतो.

मुंबईचे मणकारोगतज्ज्ञ डॉ. शेखर भोजराज हे रुग्णांसाठी आधारवड असून, त्यांच्या वैद्यकीय कौशल्याचा फायदा जळगावच्या रुग्णांसाठी आपण उपलब्ध करून दिला आहे.

आरोग्याच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोचविण्याचे काम आशा, अंगणवाडीसेविका करीत असून, त्यांचे विविध प्रश्न मार्गी लावले आहे.

डॉ. भोजराज यांच्या स्पाइन फाउंडेशनचे कार्य देशभरात सुरू असून, कौतुकास्पद आहे. जळगावात त्यांची सेवा मिळाली. आता सरकारी रुग्णालयात मोफत उपचार सेवा सुरू झाली असून, त्यामुळे सामान्यांना दिलासा मिळाला आहे.

Guardian Minister Gulabrao Patil at the inauguration of the latest surgical theater in the Government Medical College and Hospital
Nashik: पिनाकेश्वर येथे भाविकांची आर्थिक लूट सुरू! वनविभागाची मनाई असूनही ट्रस्टतर्फे पार्किंग शुल्क आकारणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()