Gulabrao Patil News : जिल्हा परिषदेच्या सर्व वर्गखोल्या होणार प्रकाशमान; 1,800 शाळांना लाभ

Funding
Fundingesakal
Updated on

Gulabrao Patil News : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील १ हजार ८२१ जिल्हा परिषद शाळांच्या बळकटीकरणासाठी ४ कोटी ५३ लाखांचा निधी जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून मंजूर केला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांचं रूपडं पालटणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली‌.

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जळगाव जिल्हा परिषदेच्या सर्व वर्ग खोल्या प्रकाशमान होणार आहेत.(gulabrao patil statement of All classrooms of Zilla Parishad will be bright jalgaon news)

जिल्हा वार्षिक योजना २०२३-२४ मधून विशेष दुरुस्ती योजनेअंतर्गत स्वच्छतागृह, शौचालय, वर्ग खोल्यांची दुरुस्ती, वर्गातील इलेक्ट्रिक फिटिंग या कामांसाठी ४ कोटी ५३ लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

साडेसहा हजारांवर वर्गखोल्या प्रकाशमान

जिल्हा परिषदेच्या वर्ग खोल्यांमध्ये पुरेसा प्रकाश असेल तर विद्यार्थ्यांना कोणतेही नेत्र विकार होणार नाहीत, वर्गात पुरेशी हवा खेळती राहावी म्हणून जिल्ह्यातील सर्व १८२१ जिल्हा परिषदेच्या शाळांमधील ६६९१ वर्ग खोल्यांमध्ये प्रत्येक वर्ग खोलीत दोन एलईडी ट्यूब व एक पंखा बसवण्यासाठी १ कोटी ८५ लाखांची रुपयाची तरतूद केली आहे.

वर्ग खोल्यांची दुरुस्ती, स्वच्छतागृह, शौचालय यांची दुरुस्ती, रॅम्पची दुरुस्ती, वर्ग खोल्यांमध्ये इलेक्ट्रिक फिटिंग या कामासाठी २ कोटी ७९ लाख असा एकूण ४ कोटी ५३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामासाठी पालकमंत्री पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन व मदत, पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांचे मार्गदर्शन लाभल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

Funding
Gulabrao Patil News : नशिराबादकरांची तहान ‘अमृत' मधून भागविणार : गुलाबराव पाटील

‘निपुण भारत’ कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांच्या गुणवत्ता विकासासाठी जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद अनेक उपक्रमांची अंमलबजावणी करीत आहे, त्याचाच एक भाग म्हणून आज जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांसाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे. यापूर्वी देखील पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ५०० पेक्षा जास्त जिल्हा परिषद शाळांसाठी संरक्षक भिंतीचे काम पूर्ण करण्यात आलेले आहे.

बैठकीत आढावा

नुकतीच जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, यांची मॅरेथॉन बैठक जिल्हाधिकारी प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली. सीईओ अंकीत यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यात प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी सविस्तर आढावा सादर केला.

प्राथमिक शिक्षणाचा आणि जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सलग चार तास तालुका निहाय आढावा घेतला. महिन्याच्या दुसऱ्या/तिसऱ्या गुरुवारी यापुढे देखील असाच आढावा घेण्यात येणार आहे.

Funding
Gulabrao Patil News : काम न करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करा : पाणीपुरवठा मंत्री पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.