Gulabrao Patil News : नशिराबादकरांची तहान ‘अमृत' मधून भागविणार : गुलाबराव पाटील

Guardian Minister Gulabrao Patil speaking
Guardian Minister Gulabrao Patil speakingesakal
Updated on

Gulabrao News Patil : नशिराबादचा कायापालट करून दाखवू असे दिलेले अभिवचन कायम लक्षात असल्याने मागील काळातील नशिराबादचा विकासाचा ‘बॅकलॉग' भरून काढणार आहे. ६७ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमृत योजनेत समावेश केला आहे.

लवकर या योजनेस तांत्रिक मान्यता मिळणार असून माणशी १३० लीटरप्रमाणे मुबलक पाण्याचा पुरवठा होईल. (Gulabrao Patil statement of Nashirabadkar thirst will be quenched from amrut scheme jalgaon news )

६७ कोटींची अमृत योजना नशिराबादकरांची तहान भागवणार आहे, अशी ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. नशिराबाद येथे विविध विकास कामांच्या लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी श्री. पाटील हे बोलत होते. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील अध्यक्षस्थानी होते.

मंत्री पाटील म्हणाले की, विकास कामे करताना कोणताही भेद भाव न ठेवता गावाची गरज लक्षात घेऊन विकासासाठी निधी दिला. विरोधकांची बोलती कामांच्या माध्यमातून बंद केली. नाशिराबादकरांसाठी एक महिन्याच्या आत ६७ कोटींची पाणीपुरवठा योजना तडीस लावणार आहे.

Guardian Minister Gulabrao Patil speaking
Gulabrao Patil News: अभ्यासात कच्चा, कलेत पक्का होतो... म्हणूनच राजकारणात! गुलाबराव पाटील

राज्यस्तरावरील नगरोत्थान योजनेंतर्गत ६१ कोटी निधीची भूमिगत गटार योजनेचा आणि २१ कोटींचा सांडपाणी प्रक्रिया व २ कोटी ४४ लाखांचा स्वच्छ भारत मिशन अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार आहे. त्यामुळे शहरातील नदीत सोडले जाणारे दूषित पाणी थांबवण्यास मदत होणार आहे.

भवानी माता मंदिर परिसराच्या पर्यटन अंतर्गत विकासासाठी ४ कोटी ९५ लाख, झिपरू अण्णा महाराज मंदिर परिसराचा विकासासाठी ४ कोटी ९१ लाख अशा एकूण १४९ कोटींचा निधीस मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा करून लवकर मान्यता देणार आहे. उपशिक्षक राजेंद्र पाचपांडे यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे यांनी प्रास्ताविक केले.

Guardian Minister Gulabrao Patil speaking
Gulabrao Patil News : गुलाबराव पाटील आणि शेतकऱ्यांमध्ये शाब्दीक चकमक; अडविला मंत्र्यांचा ताफा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.