Gulabrao Patil : जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष ११ मतदारसंघात विधानसभा निवडणूक लढायची तयारी करीत असेल, तर आम्हीही (शिवसेना) अकरा मतदारसंघात लढवायची तयारी करू. शेवटी ‘महायुतीत’ काय ठरते, त्यावर विधानसभेच्या निवडणुका लढविल्या जातील, अशी माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांना दिली. ‘भाजप’तर्फे गेल्या शनिवारी (ता. ३) मेळावा झाला. त्यात जळगाव जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात भाजपची ताकद वाढली आहे. (Preparation of Shiv Sena in 11 constituencies )