Jalgaon News : रस्ता सुरक्षा हे केवळ अभियान काळापुरते मर्यादित न ठेवता नेहमीसाठी याची अंमलबजावणी करा. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सामूहिक जबाबदारी स्वीकारून रस्ता सुरक्षा अभियान ही लोक चळवळ बनवावी.
हे अभियान सात दिवसांसाठीच नसून आयुष्यभरासाठी आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. (Gulabrao Patil statement of Road safety is not 7 days but of life jalgaon news)
जिल्हा रस्ता सुरक्षा समितीकडून ३३ व्या रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते मंगळवारी (ता.१६) झाले; त्यावेळी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलिस अधीक्षक एम राजकुमार, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अशोक नखाते, पोलिस उपअधीक्षक संदीप गावित, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक शिवाजी पवार, एसटीचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर आदी उपस्थित होते.
‘आरटीओ’साठी १० लाखांचा निधी
प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या बळकटीकरणासाठी जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून १० लाखांचा निधी वितरित करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी केल्या. जिल्हाधिकारी प्रसाद म्हणाले की, अपघात होऊ नये यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे.
रस्ता सुरक्षा म्हणजे आपल्या कुटुंबाची सुरक्षा आहे. परिवहन विभागाने सर्व परवाने ऑनलाइन केल्यामुळे कामांत पारदर्शकता व गतिमानता आली आहे. या वेळी पालकमंत्र्याच्या हस्ते रस्ता सुरक्षा पुस्तिकेचे प्रकाशन झाले.
सेल्फी पॉईंट, रस्ते विषयक नियम फलकांचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले. श्याम लोही यांनी प्रास्ताविक, हर्षल पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
‘पिंक’ रिक्षातून प्रवास करत महिलेशी संवाद
रस्ता सुरक्षा कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हाधिकाऱ्यांनी शहरातील ७ गुलाबी रिक्षा महिला चालकांना तिळगूळ वाटप करत मकरसंक्रातीच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम संपल्यानंतर गुलाबी रिक्षातून पालकमंत्री पाटील व जिल्हाधिकारी प्रसाद यांनी पोलिस अधीक्षक कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत प्रवास करत चालक महिलेशी संवाद साधला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.