Gulabrao Patil: स्वातंत्र्य सैनिकांच्या सन्मानाचे भाग्य लाभल्याचा अभिमान : गुलाबराव पाटील

Guardian Minister Gulabrao Patil while felicitating freedom fighters. Neighbor Collector Ayush Prasad, Superintendent of Police M. the prince
Guardian Minister Gulabrao Patil while felicitating freedom fighters. Neighbor Collector Ayush Prasad, Superintendent of Police M. the princeesakal
Updated on

Gulabrao Patil : स्वातंत्र्य सैनिकांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्याचे भाग्य लाभले, याचा मला सार्थ अभिमान आहे.

असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सोमवारी (ता. २८) येथे केले. (Gulabrao Patil statement Proud to be fortunate enough to honor freedom fighters jalgaon political)

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील २२४ स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांचा पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

त्यावेळी ते बोलत होते. आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन आदी व्यासपीठावर होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले की, स्वातंत्र्याच्या ७५ वर्षाच्या कालखंडात अनेक महापुरुषांचे योगदान लाभले आहे.

स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान फार मोलाचे आहे. त्यांचा सन्मान करताना मनात देशाविषयी गौरवाची भावना निर्माण होते. स्वातंत्र्य सैनिकांचा आदर्श ठेवत तरूणांनी देशसेवेसाठी पुढे यावे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Guardian Minister Gulabrao Patil while felicitating freedom fighters. Neighbor Collector Ayush Prasad, Superintendent of Police M. the prince
Gulabrao Patil: संजय राऊत यांनी स्वतःचे कपडे सांभाळावेत : गुलाबराव पाटील

जिल्हाधिकारी प्रसाद म्हणाले, स्वातंत्र्य सैनिकांच्या त्याग व बलिदानामुळे आज आपण मुक्तपणाने जीवन जगत आहोत. स्वातंत्र्य सैनिकांच्या जिल्हा पातळीवरील तक्रारींचे निराकरण करण्यासाठी जिल्हा प्रशासन कटीबद्ध आहे‌.

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्य सैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेल्या योगदानाप्रित्यर्थ कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी हा सोहळा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

चोपडा येथील स्वातंत्र्य सैनिक मोहनलाल छोटालाल गुजराथी यांनी वयाचे १०० वर्ष पूर्ण केल्याबाबत त्यांना पुष्पगुच्छ, सन्मानपत्र, ट्रॉफी व शाल देऊन पालकमंत्र्यांच्या हस्ते जागेवर जाऊन सन्मानित करण्यात आले.

तर, काही ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांना प्रकृतीच्या कारणास्तव व्यासपीठावर उपस्थित राहणे शक्य नसल्याने त्यांचाही पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनी जागेवर जाऊन सन्मान केला.

नायब तहसीलदार प्रदीप झांबरे, लिपिक अनिल पठाडे, दिनकर मराठे, चंद्रकांत कुंभार, प्रेमराज वाघ, राजश्री पाचपोळ, जिज्ञा भारंबे, मनिषा राजपूत, सुमती मनोरे व स्मिता महाजन यांनी संयोजन केले.

Guardian Minister Gulabrao Patil while felicitating freedom fighters. Neighbor Collector Ayush Prasad, Superintendent of Police M. the prince
Eknath Khadse News: रोहित पवार यांची 2 पासून संवाद यात्रा : एकनाथ खडसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.