Gulabrao Patil News: कृषी केंद्रचालकांवरील अन्यायकारक कायदे बदलणार : गुलाबराव पाटील

Guardian Minister Gulabrao Patil speaking at the agitation of the Agriculture Center Managers. Vinod Taral, state president of the association along with him
Guardian Minister Gulabrao Patil speaking at the agitation of the Agriculture Center Managers. Vinod Taral, state president of the association along with himesakal
Updated on

Gulabrao Patil News : कृषी केंद्रचालकांवरील अन्यायकारक कायदे कॅबिनेट बैठकीत बदलण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे पाणीपुरवठा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. कृषी केंद्रचालकांच्या आंदोलनांत ते बोलत होते. शासनाने कृषी केंद्रचालकांवर अन्यायकारक कायदे प्रस्तावित केले आहेत.

यात एखाद्या उत्पादक कंपनीचे बियाणे न उगविल्यास त्या अंतर्गत थेट कृषी केंद्रचालकांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाईचा प्रस्ताव ठेवला आहे. या कायद्याविरुद्ध राज्यातील कृषी केंद्रचालकांनी तीन दिवसापासून व्यवहार बंद ठेवला आहे. (Gulabrao Patil statement Unfair laws on agriculture center managers will be changed jalgaon news)

महाराष्ट्र राज्य सीड्स ॲन्ड पेस्टिसाईड्स डीलर्स असोसिएशनच्या अंतर्गत आंदोलन करण्यात येत आहे. शनिवारी (ता.४) तिसऱ्या दिवशीही राज्यातील कृषी केंद्र चालकांची दुकाने बंद होती. जुन्या भिकमचंद जैन व्यापारी संकुलात जिल्ह्यातील विक्रेत्यांतर्फे असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष विनोद तराळ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले.

या वेळी जिल्हा असोसिएशनचे राजेंद्र पाटील, कैलास मालू, पाचोरा तालुकाध्यक्ष राजू बोथरा, धरणगाव तालुकाध्यक्ष उदय झंवर, रावेर तालुकाध्यक्ष सुनील कोंडे यांच्यासह जिल्ह्यातील विक्रेत्यांची उपस्थिती होती. पालकमंत्री गुलाबराव पाटील या वेळी बोलताना म्हणाले, कृषी केंद्रचालकांवर प्रस्तावित अन्यायकारक कायदे मागे घेण्यात येतील.

Guardian Minister Gulabrao Patil speaking at the agitation of the Agriculture Center Managers. Vinod Taral, state president of the association along with him
Jalgaon Municipality News : 7 लाख लोकसंख्येचा नगररचना विभाग अधिकाऱ्यांविना; जिल्हा नगररचना विभागाकडे धावाधाव

उत्पादक कंपन्यांवर जबाबदारी टाकण्यात येईल. येत्या कॅबिनेटच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात येईल. कृषी कायद्याबाबत ज्या चार जणांची समिती नियुक्त केली आहे, त्यात आपणही आहोत. या शिवाय गिरीश महाजन, कृषीमंत्री धनंजय मुंडे, राधाकृष्ण विखे- पाटील समितीत आहेत. बैठकी हे कायदे मागे घेण्याबाबत प्रस्ताव देणार आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली.

..तर बेमुदत बंद आंदोलन

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही आंदोलनाला भेट दिली. या वेळी बोलताना असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष विनोद तराळ म्हणाले, कृषी विक्रेत्यांवर अन्यायकारक कायदे लावण्यात येत आहेत. आम्ही उत्पादक कंपन्यांचा माल विकतो. त्यामुळे कारवाई अयोग्य आहे, यात उत्पादक कंपन्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. जर शासनाने हे कायदे मागे घेतले नाही तर दोन डिसेंबरपासून बेमुदत व्यवहार बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

Guardian Minister Gulabrao Patil speaking at the agitation of the Agriculture Center Managers. Vinod Taral, state president of the association along with him
Jalgaon News : रिंगरोड, हरेश्‍वर नगर, गंधर्व कॉलनी भागात कामासाठी मोठ्याप्रमाणात निधी; कामे तातडीने सुरू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.