Jalgaon Khandesh Festival: खानदेश महोत्सवातून महिला आत्मनिर्भर होतील : गुलाबराव पाटील

जळगाव शहर महापालिकेच्या महिला व बालक कल्याण विभागातर्फे चारदिवसीय खानदेश महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
Guardian Minister Gulabrao Patil, Commissioner Vidya Gaikwad, etc. while inaugurating the Khandesh festival
Guardian Minister Gulabrao Patil, Commissioner Vidya Gaikwad, etc. while inaugurating the Khandesh festival esakal
Updated on

Jalgaon Khandesh Festival : खानदेश महोत्सवातून महिला आत्मनिर्भर होतील, असे मत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.

जळगाव शहर महापालिकेच्या महिला व बालक कल्याण विभागातर्फे चारदिवसीय खानदेश महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्‍घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. (Gulabrao Patil statement Women will become independent through Khandesh festival jalgaon news)

या वेळी व्यासपीठावर खासदार उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक डॉ. विद्या गायकवाड, अतिरिक्त आयुक्त पल्लवी भागवत, उपायुक्त निर्मला गायकवाड, उपायुक्त अविनाश गांगोडे, सहाय्यक आयुक्त अश्विनी गायकवाड, अभिजित बाविस्कर, गणेश चाटे, माजी नगरसेवक कुंदन काळे, ॲड. पोकळे आदी उपस्थित होते.

उपायुक्त निर्मला गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी महोत्सवाच्या आयोजनाची भूमिका विशद केली. आमदार सुरेश भोळे यांनी आभार मानले.

Guardian Minister Gulabrao Patil, Commissioner Vidya Gaikwad, etc. while inaugurating the Khandesh festival
Gulabrao Patil : आरोग्य सुदृढसाठी गाव हागणदारीमुक्त हवे : पालकमंत्री पाटील

डायनॅमिक पालकमंत्री : खासदार उन्मेष पाटील

खासदार उन्मेष पाटील यांनी, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे ‘आमचे डायनॅमिक पालकमंत्री’, असा उल्लेख करत भाषणास सुरवात केली. राज्यात सर्वाधिक डीपीसीचा निधी विकासकामांसाठी मनपा, जिल्हा परिषद व प्रशासनाला देण्याचा नवा पायंडा पालकमंत्र्यांनी पडला.

महिला गटांना व्यासपीठ : आयुक्त डॉ. विद्या गायकवाड

आयुक्त डॉ. विद्या गायकवाड म्हणाल्या, की खानदेश महोत्सव ही जळगावकरांसाठी एक खास मेजवानी आहे. महिला बचतगटांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासह त्यांना रोजगार मिळतो. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या, तर भारताला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यापासून कोणीच थांबवू शकणार नाही. या वेळी उपायुक्त निर्मला गायकवाड यांनीही मनोगत व्यक्त केले.

Guardian Minister Gulabrao Patil, Commissioner Vidya Gaikwad, etc. while inaugurating the Khandesh festival
Radhakrishna Game: योजनांच्या अंमलबजावणीसाठी गावपातळीवर जा : राधाकृष्ण गमे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.