Gulbrao Patil : जळगाव जिल्हा विविध योजना व उपक्रमांच्या अंमलबजावणीत कायम अग्रेसर राहिला आहे. ‘आयुष्यमान भव:’ अभियानातही जिल्ह्याचे काम राज्यात अग्रेसर ठरेल, असा विश्वास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी येथे व्यक्त केला.
जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला पाच लाखांपर्यंत मोफत उपचार देणारे ‘आयुष्यमान कार्ड’चे प्रशासनाने घरोघरी वितरण करावे, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. (Gulbrao Patil statement Jalgaon will be leader in Ayushyaman Bhava campaign jalgaon)
जळगाव जिल्ह्यातील अभियानाचे उद्घाटन श्री. पाटील यांच्या हस्ते रविवारी (ता. १७) झाले. त्यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्ह्यातील आरोग्य अधिकारी, कर्मचारी, आशासेविका, नागरिक यांच्याशी फेसबुक लाईव्हद्वारे थेट संवाद साधला.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित आदी उपस्थित होते. पालकमंत्री पाटील म्हणाले, आयुष्मान भारत आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे जिल्ह्यात चांगले काम होत आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
उर्वरित नागरिकांनाही या दोन्ही योजनांची ओळखपत्रे काढून द्या. तळागाळातील जनतेपर्यंत वैद्यकीय सेवा आणि औषधोपचार पोचवा. आपली जबाबदारी मानून गोरगरिबांची सेवा प्रामाणिकपणे करा, असे आवाहनही त्यांनी केले.
या अभियानाच्या माध्यमातून स्वच्छता अभियान, आयुष्यमान सभा, अवयव दान मोहीम, रक्तदान शिबिर, अंगणवाडीमधील मुलांची तपासणी यासारखे उपक्रम राबवून जिल्ह्यातील नागरिकांना चांगल्या प्रकारचे आरोग्य मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहावे.
जिल्ह्यातील प्रत्येकाने सहभागी होऊन आयुष्यमान भव: ही मोहीम लोक चळवळ म्हणून उभी करावी. अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी या वेळी केल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.