Gurumauli Annasaheb More : समाजाने एकत्र येऊन विधायक शक्ती वृद्धिंगत व्हावी या हेतूने लोकमान्य टिळक यांनी गणेशोत्सव सुरु केला. देशावर अनेक शतके परकीयांनी राज्य केले. इंग्रजांनी हा देश ताब्यात घेऊन आपलं स्वातंत्र्य हिरावून घेतलं.
या परकीय शक्तीच्या विरोधात उभं राहण्यासाठी देशवासीयांना आत्मबल प्राप्त होऊन इंग्रजांनी या देशातून काढता पाय घ्यावा, यासाठी सुद्धा लोकमान्य टिळकांसारख्या राष्ट्रपुरुषाने गणेशोत्सवाचे माध्यम निवडले. आज हा उत्सव साजरा करताना या मुळ हेतूचा आपणास विसर पडायला नको, असे आवाहन गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी केले.
(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)
दिंडोरी येथील प्रधान श्री स्वामी समर्थ केंद्रात आज उपस्थित महिला पुरुष भाविक व सेवेकऱ्यांशी हितगूज करीत असताना त्यांनी हे आवाहन केले. आपल्या कौटुंबिक, सामाजिक, राष्ट्रीय समस्या मार्गी लागाव्यात म्हणून जगभरातील हजारो समर्थ केंद्राच्या माध्यमातून वर्षभर सातत्याने अखंडितपणे गणपती सेवा दिली जाते.
मनोभावे लाखो सेवेकरी ही सेवा करतात. हे बुद्धीचे दैवत सर्वांचे कल्याण करणारे आहे म्हणून फक्त दहा दिवस सेवा न करता ती वर्षभर केल्यास हा सुखकर्ता कायम आपणावर प्रसन्न राहीन असा विश्वासही गुरुमाऊलींनी व्यक्त केला.
सेवामार्गाच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या पर्यावरणपुरक गणेशोत्सव जगभर कसा साजरा केला जात आहे व यातूनच वृक्षारोपण महाअभियानही कसे हाती घेण्यात आले आहे, याबाबत सुद्धा गुरुमाऊली यांनी सर्वाना माहिती दिली.
ते म्हणाले गेल्या अनेक वर्षांपासून समर्थ सेवेकरी मातीचा गणपतीबाप्पा आपल्या घरी आणतात विशेष म्हणजे ही मूर्ती तयार करताना त्यात विविध आयुर्वेदिक, उपयोगी वनस्पती, झाडांच्या बिया टाकलेल्या असतात.
या गणेशाचे विसर्जन आपल्या बागेत, सार्वजनिक मोकळ्या जागेत केल्यास आपण झाड लावण्याचे पुण्य देखील आपल्या पदरी पडेल.सजावटीसाठी सुद्धा प्लास्टिक, थर्मोकोल न वापरता नैसर्गिक पाने, फुले वापरावीत.
गुरुमाऊली यांनी सेवामार्गाचे ग्रामअभियान व विविध विभागातून सुरु असलेल्या कार्याचा आढावा घेतला. उपस्थित सर्व सेवेकरी व भाविकांनी आरती, पालखी सेवेचा मनमुराद आनंदही लुटला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.