Jalgaon Crime News : गुटखा तस्कर कारसह LCBच्या जाळ्यात पावणेतीन लाखांच्या गुटखा जप्त, एकाला अटक

Sheikh Imran Sheikh Zahuruddin
Sheikh Imran Sheikh Zahuruddinesakal
Updated on

जळगाव : परराज्यातून मागवण्यात आलेल्या गुटख्याची तस्करी करून जळगावात आणत असताना गुन्हेशाखेच्या पथकाने इंडिका कारसह एका भामट्याला ताब्यात घेतले. चौकशी केल्यावर कार मध्ये २ लाख ७५ हजार २६४ रुपयांचा गुटखा व सुंगधी तंबाखूचा साठा मिळून आला.शेख इम्रान शेख जहुरोद्दीन (रा. तांबापूरा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

गुटख्याची तस्करी करण्यात येत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांना मिळाली होती. अप्पर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्यासह गुन्हे शाखेचे निरीक्षक किशन नजन पाटील यांना याबाबत आदेश दिले. (Gutka smugglers with car caught in LCB Gutkha worth 3 lakh seized one arrested Jalgaon Crime News)

हेही वाचा : ..तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड

Sheikh Imran Sheikh Zahuruddin
SAKAL Impact News : समस्या दूर होताच साईंग्राम उद्यान चकाचक!

गुन्हेशाखेच्या पथकातील उपनिरीक्षक गणेश चोभे, युनूस शेख, रणजित जाधव, श्रीकृष्ण देशमुख, विनोद पाटील, प्रमोद ठाकूर यांच्या पथकाने भुसावळकडून जळगावच्या दिशेने येणारी इंडिका कार (एमएच १९ एएक्स ३५१०) या वाहनाबाबत खात्री झाल्याने इंडिका कारचा शोध सुरु झाला.

संध्याकाळी भुसावळ-जळगाव रेाडवरील तोलकाट्याजवळ संशयित वाहन आले असताना त्याला थांबवून तपासणी करण्यात आली. गाडीत गुटखा, सुगंधी तंबाखूच्या गोण्या असल्याचे आढळून आले. तत्काळ गुन्हेशाखेचे निरीक्षक किशन नजन पाटील यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाला बोलाविले.

नशिराबाद पोलिस ठाण्यात प्राप्त मालाची मोजणी करण्यात येऊन दोन लाख ७५ हजार २६४ रुपयांचा गुटखा सुगंधी तंबाखू मिळून आल्यावर गाडीसोबत असलेला शेख इम्रान शेख जहुरोद्दीन (रा. तांबापूरा) याला कारसह ताब्यात घेत त्यांच्या विरुद्ध नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sheikh Imran Sheikh Zahuruddin
Crime News : विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून पत्नीची हत्या; मृतदेहाचे तुकडे करून कालव्यात दिले फेकून

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.