Jalgaon News : हमालाने युट्युब बघून काढला चक्क नोटा छापण्याचा कारखाना!

fake Press Currency factory
fake Press Currency factoryesakal
Updated on

जळगाव : जळगावात हमाली करता-करता एकाने चक्क घरातच नोटा छापण्याचा कारखाना उघडला. युट्युबवर (Youtube) व्हिडिओ बघून घरीच २० हजाराच्या नकली नोटा छापून टाकल्या. (hamal opened currency printing factory in his house by watching youtube video jalgaon news)

नोटा चालविण्यासाठी ५० हजारात दीड लाखाच्या नोटा देणाऱ्या महाठगला उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांच्या पथकाने सापळा रचून अटक केली. पथकाने त्याच्याकडून १ लाख ६८ हजार ९०० रुपयांच्या १००, २०० आणि ५०० रुपयांच्या नोटा जप्त केल्या आहेत.

जळगाव जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात नकली नोटा चलनात आल्या असून पोलिसांकडून काही दिवसापूर्वी देखील बनावट नोटा पोलिसांनी पकडल्या होत्या. बुधवारी चोपडा उपविभागीय कार्यालयातील पोलिस नाईक राहुल बैसाने यांना एक व्यक्ती बनावट नोटा छपाई करून विक्री करीत असल्याबाबत माहिती मिळाली होती.

बैसाने यांनी जळगाव उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांना कळविले. उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गोपाळ देशमुख, पोलिस कर्मचारी महेश महाले, रवींद्र मोतीराया, नीलेश पाटील, सचिन साळुंखे, सुहास पाटील, राहुल बैसाने, रेवानंद साळुंखे, चंद्रकांत पाटील, विजय पाटील यांनी सापळा रचून नोटा छपाई करणाऱ्या देविदास पुंडलिक आढाव (वय-३१, रा.कुसुंबा) याला बोलाविले.

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

fake Press Currency factory
Jalgaon News : ‘नाफेड’अंतर्गत हरभरा खरेदीला सुरवात; 17 केंद्रांवर नोंदणीचे पणनचे आदेश

५० हजारात दीड लाखांच्या बनावट नोटा देण्याचा हिशोब ठरला होता. पोलिसांनी त्याला तीन लाखांच्या नोटांची मागणी केली होती. आढाव याला संशय आल्याने अगोदर त्याने पोलिसांना चकवा दिला. सुमारे तीन तास पोलिसांना चकवा दिल्यावर त्याने गावाबाहेर एका टेकडीवर बोलाविले. आढाव दुचाकी (क्रमांक एमएच.१९.डीयू.१२०३) घेऊन त्याठिकाणी उभा होता.

पथकातील दोन कर्मचारी अगोदर पुढे गेले आणि त्यांनी त्याच्याकडून नोटा पाहून त्याला ताब्यात घेताच लपलेले इतर कर्मचारी देखील तिथे पोहचले. पथकाने आढाव यांच्याकडून १००, २०० आणि ५०० च्या १ लाख ६८ हजार ९०० रुपयांच्या नकली नोटा व त्याच्या घरून प्रिंटर, रंग आणि नोटा छपाईचे कागद हस्तगत केले.

fake Press Currency factory
Jalgaon News : ‘50 खोके एकदम ओक्के’चा हल्लाबोल करणारे आमदार अनिल पाटील पुन्हा आक्रमक?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.