Jalgaon News : नागदरोडवरील अतिक्रमणांवर हातोडा; चाळीसगाव पालिकेची कारवाई

Chalisgaon: Head of Municipal Encroachment Removal Department Dinesh Jadhav and his colleagues while removing encroachment on Nagad road.
Chalisgaon: Head of Municipal Encroachment Removal Department Dinesh Jadhav and his colleagues while removing encroachment on Nagad road.esakal
Updated on

Jalgaon News : शहरात धुळे रस्त्यावरील वाय पॉईंट, रेल्वे स्टेशनच्या समोरील व आजूबाजूचा परिसर, बस स्थानकाच्या कंपाऊंडचा भाग आदी अतिक्रमण हटविल्यानंतर पालिकेने आपला मोर्चा नागर रोडकडे वळवला आहे. या भागातील अतिक्रमण पालिकेच्या पथकाने आज काढण्यास सुरवात केली.

शहरातील घाट रोडवरील अँग्लो उर्दू हायस्कूलला अतिक्रमणाने वेढलेले होते. चार- पाच दिवसांपासून मुस्लिम बांधव तहसील कार्यलयासमोर उपोषणाला देखील बसले होते. याशिवाय उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांनी मोर्चा देखील काढला होता. (Hammer on encroachment on Nagda Road Action of Chalisgaon Municipal Satisfaction from citizens Jalgaon News)

त्याची गंभीर दखल घेत, पोलिस प्रशासन व पालिकेने या भागातील अतिक्रमण काढण्यास सुरवात केली. रविवारी (ता. ४) सुटीचा दिवस असतानाही मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली अभियंता प्रदीप धनके, अतिक्रमण निर्मुलन विभागाचे प्रमुख दिनेश जाधव, त्यांचे सहकारी प्रेमसिंग राजपूत, सुमित सोनवणे, नितीन सूर्यवंशी, अमित सोनवणे, किरण मोरे आदींनी नागद रस्त्यावरील अतिक्रमण काढले.

उर्वरित अतिक्रमण देखील काढले जाणार असून अतिक्रमणधारकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घ्यावे, असे आवाहन मुख्याधिकारी श्री. ठोंबरे ह्यांनी केले आहे. अतिक्रमण निर्मुलन विभाग प्रमुख श्री. जाधव यांनी अतिक्रमित टपरीधारकांना स्वतःहून अतिक्रमण काढण्याची संधी दिली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Chalisgaon: Head of Municipal Encroachment Removal Department Dinesh Jadhav and his colleagues while removing encroachment on Nagad road.
Nashik Accident News : कसारा घाटात 4 वाहनांचा विचित्र अपघात ; 2 जण ठार,1 जखमी; शेकडो कोंबड्या मृत्युमुखी

व्यापारी संकुलाला वेढा

नागद रोडवरील व्यापारी संकुल भंगार विक्रेत्यांच्या अतिक्रमणाने अनेकदा झाकले जाते. या भागातील अतिक्रमणाला कंटाळून अनेक गाळेधारकांनी गाळे विकून टाकले आहेत. या भागात दर शनिवारच्या बाजारात छोट्या विक्रेत्यांनाही या अतिक्रमणाचा त्रास होतो.

त्यामुळे पालिकेने या गाळ्यांसमोरील अतिक्रमण देखील काढावे व ही कार्यवाही सुरुच ठेवावी, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Chalisgaon: Head of Municipal Encroachment Removal Department Dinesh Jadhav and his colleagues while removing encroachment on Nagad road.
Nashik News : शिक्षकांच्या वरिष्ठ निवड श्रेणी प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा सुरू; या तारखेपर्यंत नोंदणीस मुदत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.