Jalgaon News : जून महिन्याचे दहा दिवस उलटले, तरी अद्याही जिल्ह्यात मान्सून दाखल झाला नाही. यामुळे जिल्हा प्रशासन पाणी टंचाई बाबत अलर्ट मोडवर आले आहे.
जिल्ह्यातील हतनूर, गिरणा, वाघूर प्रकल्पाचे सर्व दरवाजे बंद करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले असून, त्यानुसार शनिवारी (ता. १०) सकाळी सर्व दरवाजे बंद करण्यात आले. (Hatnur Girna Waghur Project doors closed Administration alert as soon as signs of prolonged rain Special Scarcity Plan Jalgaon News)
या सिंचन प्रकल्पांतून आता केवळ पिण्यासाठी पाणी सोडले जाईल. तेही गरज पडेल तेव्हा जिल्हा प्रशासनाच्या आदेशानेच.
जिल्ह्यातील अतितापमानाने विहिरींची पाणी पातळी घटली आहे. बोदवड, यावल, भुसावळ आणि जामनेर तालुक्यांतील भूजल पातळीत ०.३५ मीटरने घट झाली. किमान सात जूनला काही प्रमाणात तरी पाऊस पडणे अपेक्षीत होते.
मात्र, तसे झालेले नाही. यामुळे पाऊस आणखी किती दिवस लांबेल हे सांगणे शक्य नाही.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
यामुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पातील आता केवळ पाणी पिण्यासाठी आरक्षीत आहे. धरणाचे काही गेट सुरू होते.
मात्र, तेही आता बंद करण्यात आले आहेत. सिंचन प्रकल्पातील पाणी आगस्टपर्यंत पुरले पाहिजे, त्या अनूषंगाने उपाय योजना जिल्हा प्रशासनाने केल्या आहेत.
जानेवारी ते जूनपर्यंत एक टंचाई आराखडा तयार होता. जून महिन्यात पाउस न झाल्यास सिंचन प्रकल्पातील पाणी आगस्टपर्यंत कसे पुरेल, यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे. सोबतच टंचाई निवारण्यासाठीचे विविध उपायांचा अवलंब करीत आहेत.
विशेष टंचाई आराखडा
जिल्हा प्रशासनाने जानेवारी ते जून दरम्यान दोन कोटी ४४ लाख ६९ हजारांचा टंचाई आराखडा तयार केला आहे. त्यानूसार टंचाईवर उपाय योजना सुरू आहे. यंदा ‘अल निनो’च्या प्रभावामुळे तापमानात वाढ होईल, सोबतच पावसाळाही लांबत आहे.
त्यामुळे जिल्हा प्रशासनाने खास बाब म्हणून एक कोटी ९७ लाख ९३ हजारांचा विशेष टंचाई आराखडा तयार करून ठेवला आहे. जूननंतर पाऊस झाला नाही, तर या आराखड्यातील तरतुदीतून पाणीपुरवठ्याची व्यवस्था केली जाणार आहे.
सिंचन प्रकल्पातील पाणीसाठा असा
सिंचन प्रकल्प पाणीसाठा (टक्के) झालेला पाउस (मिमी)
हतनूर ४१.९६ ९
गिरणा २३.४३ ७
वाघूर ६२.५३ ०
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.