जळगाव : महापालिकेच्या (jalgaon Municipal Corporation) गटनेतेपदाबाबत औरंगाबाद खंडपीठात २६ जुलैला पुढील सुनावणी होणार आहे. जळगाव महालिकेत भारतीय जनता पक्षातून २७ नगरसेवक फुटले. त्यानंतर त्यांनी गटनेतेपदावर दावा केला आहे. तर भारतीय जनता पक्षाने आपलाच गटनेता असल्याचे नूमद केले आहे. (Hearing on July 26 in bench regarding post of group leader of jalgaon corporation Jalgaon News)
त्यामुळे महापालिकेत आमच्याच गटाच्या नेत्याचा व्हीप मानला जाईल, असे दोन्ही गटांनी दावा केला आहे. त्यामुळे भाजपचा गटनेता कोण? यासाठी दोन्ही गटाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. त्यावर बुधवारी (ता. ६) सुनावणी होती. मात्र, ही सुनावणी आता २६ जुलैला होणार असल्याचे याचिकाकर्ते भाजप बंडखोर गटाचे नेते ॲड. दिलीप पोकळे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.