Jalgaon Rain Update : जिल्ह्यात पावसाचा पुन्हा ‘ब्रेक’; शुक्रवार-शनिवारी जोरदार पावसाचा अंदाज

Farmer Rain Waiting
Farmer Rain WaitingSakal
Updated on

Jalgaon Rain Update : शहरासह जिल्ह्यात मागील आठवड्यात बुधवार, गुरूवार व शुक्रवारी चांगला पाऊस झाला. यामुळे धरणांतील पाणीसाठा वाढला. पिकांना जिवदान मिळाले. मात्र, असे असले तरी शनिवारपासून (ता. ९) पावसाने पुन्हा ब्रेक घेतल्याचे चित्र आहे. त्यातच, पिकांच्या आणखी वाढीसाठी जोरदार पावसाची गरज आहे.

पावसाने ऑगस्ट महिन्यात पूर्ण ब्रेक घेतल्यानंतर जिल्ह्यात दूष्काळाचे सावट जाणवत होते. सप्टेंबर महिन्यातच आक्टोबर हिटचा अनूभव नागरिकांनी घेतला. मात्र गेल्या आठवड्यात सलग तिन दिवस अनेक ठिकाणी जोरदार पाउस झाला. (Heavy rain expected Friday Saturday in jalgaon news)

यामुळे खरीप हंगामाला पून्हा नवा ‘बुस्ट’ मिळाला होता. पाऊस चांगला झाल्याने पिकेही तरारली होती. आताही पिकांची वाढ होत आहे. मात्र, पिकांच्या वाढीसाठी व सिंचन प्रकल्पात पाण्यासाठी अजून पावसाची गरज आहे.

दरम्यान, ‘अलनिनो’च्या प्रभावाने पाऊस थांबला असला, तरी येत्या शुक्रवारी (ता.१५) व शनिवारी (ता. १६) जिल्ह्यात अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान अभ्यासक निलेश गोरे यांनी व्यक्त केला आहे. तर, हवामान विभागानेही १५ ते २० सप्टेंबरपर्यंत उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तविली आहे.

बागायती कापसाला बोंड

ज्या शेतकऱ्यांची शेती बागायती आहे, त्यांनी पेरलेल्या कापसाला बोंडे लागू लागली आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Farmer Rain Waiting
Maharashtra Rain Alert : राज्यात येत्या ४८ तासांत पुन्हा मुसळधार; 'या' जिल्ह्यांना IMDचा इशारा

दुसरीकडे कोरडवाहू शेतकऱ्यांच्या कापसाची अजून वाढच अपूर्ण आहे. पोळ्याला काहींचा कापूस घरात येतो.

यंदा मात्र तसे चित्र नाही. उडीद, मुग, तूर, सोयाबिन पिकांचे उत्पादन सप्टेंबर महिन्यात येते. मात्र, यंदा पावसाअभावी उशिराने पेरण्या झाल्या. नंतर पावसाने तब्बल सव्वा महिन्याची ओढ दिल्याने पिकांची वाढ खुंटली होती. आता नुकत्याच झालेल्या पावसाने पुन्हा वाढ होत आहे. मात्र, उत्पादनात मोठी घट येणार असल्याने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे.

पिकांचे सर्वेक्षण सुरु

ज्या पिकांची वाढ खुंटलेली आहे, अशा पिकांचे सर्वेक्षण करून त्यांना विमा कंपनीकडून २५ टक्के भरपाइ देण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. त्यानूसार कृषी विभागाने पिकांचे सर्व्हेक्षण केल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

Farmer Rain Waiting
Rain News : उत्तर महाराष्ट्रात 15 सप्टेंबरपासून पावसाचा अंदाज; 70 ते 130 मिलिमीटरची शक्यता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.