Jalgaon News : म्हातारपणातही पुरावा देण्यासाठी कसरत; पेन्शनधारकांना सरकारकडून मुदत

Combined hearing on pension question
Combined hearing on pension questionesakal
Updated on

Jalgaon News : नोव्हेंबर महिना सेवानिवृत्त पेन्शनधारकांसाठी खूप महत्त्वाचा आहे. या महिन्यात आपण जिवंत असल्याचा पुरावा देण्यासाठी म्हणजे वार्षिक जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सरकारकडून डेडलाईन दिली आहे.

१ ते ३० नोव्हेंबर २०२३ दरम्यान, हा पुरावा देण्यासाठी वेळ दिली आहे. त्यामुळे पुरावा देण्यासाठी त्यांना कसरत करावी लागत आहे. पण, चिवट पेन्शनधारक म्हातारपणातही अडथळे पार करून ‘टायगर जिंदा है’ हे सांगण्यासाठी धडपडत आहेत.(help for Pensioners from Government jalgaon news)

३० नोव्हेंबरपर्यंत द्यावा लागणार पुरावा

देशभरातील केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या कोट्यवधी निवृत्त वेतनधारकांना नोव्हेंबर महिन्यात दरवर्षी एकदा जीवन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. पेन्शनधारक तसे करू शकला नाही, तर डिसेंबर महिन्यापासून त्याला पेन्शन मिळणे बंद होईल. यासाठी ३० नोव्हेंबर २०२३ ही अंतिम तारीख दिली आहे.

दरम्यान, हयातीचा दाखला सादर करण्यासाठी निवृत्ती वेतनधारकांना कसरत करावी लागते. प्रमाणपत्र डिजिटल सादरीकरणासाठी डिजिटली साक्षर नसतात तसेच वयोमानामुळे हालचाली मंदावल्यामुळे अनेकांना बँकेत जाता येत नाही.

हयातीचे प्रमाणपत्र येथे मिळतो

निवृत्त वेतनधारक त्यांच्या बँक, कोशागार कार्यालय किंवा पोस्ट कार्यालयात त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात. मात्र, बँकेत जाता येत नसेल तर तुम्ही घरी बसूनही हे करू शकता. याचा नमुना बँक, सरकारी कार्यालय, पोस्ट ऑफिस, तसेच jeevanpramaan.gov.in या अॅपच्या माध्यमातून मिळवता येते.

Combined hearing on pension question
Jalgaon News : महर्षी व्यास मंदिरासाठी 4 कोटीचा निधी अमोल जावळेंच्या प्रयत्नांना यश

या वयातही कसरत कशी करायची?

बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करताना अंगठ्यांचे ठसे जुळत नाहीत. आधारकार्डावरील तपशील वेगळा असणे, त्यामुळे प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी येतात. त्यासाठी ई-सेवा केंद्रात हेलपाटे मारावे लागतात.

''वयोमानामुळे हालचाली मंदावतात, दिसत नाही, त्यामुळे प्रत्यक्ष बँकेत जाऊन योग्य ती माहिती भरून देणे व प्रमाणपत्र मिळवणे शक्य होत नाही. यावर विचार करावा.''- नितीन सोनार, ज्येष्ठ नागरिक.

''काही बँकांमध्ये हयातीचा दाखला बँकेत जावूनच द्यावा लागतो. काही ज्येष्ठांना वयोमानामुळे शक्य होत नाही. माझे सेंट्रल बँकेत खाते आहे. तेथे ज्येष्ठ नागरिक गेले आणि लिहून दिले तरी चालते.''- ॲड. अरुण धांडे, अध्यक्ष चैतन्य नगर ज्येष्ठ नागरिक संघ

Combined hearing on pension question
Jalgaon News : महामार्गावर ‘बर्निंग ट्रॅव्हल्स’चा थरार; सतर्कतेमुळे जीवितहानी टळली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.