Jalgaon News : नवीन शैक्षणीक धोरण हे विद्यार्थ्यांना नवीन दिशा देणारे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील

विद्यार्थ्यांच्या प्रॅक्टिकल नॉलेजवर भर नवीन शैक्षणीक धोरण हे विद्यार्थ्यांना नवीन दिशा देणारे असणार आहे, यात विद्यार्थ्यांना घोकम पट्टी नसून यात त्यांना प्रॅक्टिकल नॉलेजवर जास्त भर दिला जाणार आहे.
Minister of Higher and Technical Education Chandrakant Patil while giving instructions in the joint deliberation meeting of the president and secretary of the educational institution. MLA Shirish Chaudhary, Secretary P.R. Chaudhary, Vice-Chancellor V. L. Maheshwari, Anil Rao.
Minister of Higher and Technical Education Chandrakant Patil while giving instructions in the joint deliberation meeting of the president and secretary of the educational institution. MLA Shirish Chaudhary, Secretary P.R. Chaudhary, Vice-Chancellor V. L. Maheshwari, Anil Rao.esakal
Updated on

Jalgaon News : विद्यार्थ्यांच्या प्रॅक्टिकल नॉलेजवर भर नवीन शैक्षणीक धोरण हे विद्यार्थ्यांना नवीन दिशा देणारे असणार आहे, यात विद्यार्थ्यांना घोकम पट्टी नसून यात त्यांना प्रॅक्टिकल नॉलेजवर जास्त भर दिला जाणार आहे.

यासाठी महाविद्यालय परिसरातील विविध कंपन्या, शासकीय व निमशासकीय कार्यालय, बँक आदी ठिकाणी विद्यार्थ्यांना इंर्टनशिप करण्याची संधी मिळणार आहे. (Higher and Technical Education Minister Patil statement on New education policy giving new direction to students jalgaon news)

यासाठी त्यांना मानधन देखील दिले जाण्याचे प्रयोजन करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे शैक्षणीक संस्थाचालकांनी विद्यार्थ्यांची इंर्टनशिप करावी या बाबत शंका बाळगू नये अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शैक्षणीक संस्था अध्यक्ष व सचिव यांच्या सहविचार सभेत त्यांनी दिल्या.

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीत उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अधिनिस्त असलेल्या शैक्षणीक संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांची 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०'या विषयावर सहविचार सभा झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार शिरीष चौधरी, अतिथी कुलगुरू व्ही. एल. माहेश्वरी, नवीन शिक्षण धोरण समिती सुकाणू समितीचे सदस्य अनिल राव, धनाजी नाना चौधरी महाविद्यालय संस्था सचिव डॉ. पी. आर. चौधरी उपस्थित होते.

Minister of Higher and Technical Education Chandrakant Patil while giving instructions in the joint deliberation meeting of the president and secretary of the educational institution. MLA Shirish Chaudhary, Secretary P.R. Chaudhary, Vice-Chancellor V. L. Maheshwari, Anil Rao.
Jalgaon News : रिक्षाचालकाच्या मुलाने मिळविली ‘पीएच.डी.’

प्रास्ताविकात आमदार चौधरी म्हणाले की नवीन शैक्षणिक धोरणाची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी अनेक उपाययोजना करण्याची गरज आहे. ज्या अडचणी येत आहेत. त्या कशा दूर करता येतील याचा विचार झाला पाहिजे. उदाहरणार्थ महाविद्यालयांसाठी लागणारे शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी वेतनेत्तर अनुदान कायम विनाअनुदानित धोरण बदलून अनुदानित धोरण होणे अत्यंत गरजेचे आहे.

शिक्षण समाज विकासाची साधन असल्याने त्याकडे दुर्लक्ष न करता शिक्षण संस्था कशा सक्षम आणि बळकट होतील या विषयी कौशल्य आधारित विद्यार्थी घडवण्यासाठी महाविद्यालयात लागणाऱ्या सुविधा कशा देता येतील याचा विचार शासन स्तरावर होणे गरजेचे आहे. महाविद्यालय चालवीत असताना महाविद्यालयाच्या प्राचार्या समोरील येणारे विविध प्रश्न याबाबत देखील विचार होणे गरजेचे आहे

सुकाणू समितीचे सदस्य राव यांनी नवीन शैक्षणीक धोरणा विषयी संस्थाचालकांनी माहिती देत शैक्षणीक संस्थाचालक यांच्याकडून मंत्री पाटील यांना नवीन शैक्षणीक धोरण व महाविद्यालय व शैक्षणीक संस्थापुढील अडचणी मांडल्या. संस्थेच सचिव डॉ. चौधरी यांनी आभार मानले. सूत्रसंचालन डॉ. कल्पना भारंबे आणि डॉ. नितीन बडगुजर यांनी केले.

Minister of Higher and Technical Education Chandrakant Patil while giving instructions in the joint deliberation meeting of the president and secretary of the educational institution. MLA Shirish Chaudhary, Secretary P.R. Chaudhary, Vice-Chancellor V. L. Maheshwari, Anil Rao.
Jalgaon News : फैजपूर तलाठी कार्यालयाकडून खातेदारांच्या मालमत्तेवर बोझे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.