Jalgaon News : रस्त्यांवर कोटिंगचा लेअर टाका; महामार्ग विभाग मक्तेदारांना कळविणार

Road Coating Work Incomplete
Road Coating Work Incompleteesakal
Updated on

जळगाव : शासनाच्या ४२ कोटी रुपयांच्या निधीतील कामे सुरू आहेत. मात्र, या कामातील रस्त्यावर कोटिंग करण्यात आलेले नाही. या रस्त्यावर त्वरित कोटिंगचे लेअर टाकण्यात यावे, असे आदेश मक्तेदारांना देण्यात येतील, अशी माहिती महामार्ग विभागातर्फे देण्यात आली. (highway department informed that orders will be given to monopolists to put a layer of coating on road immediately jalgaon news)

शासनाने शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी ४२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यातून तब्बल ४९ रस्त्यांची कामे करण्यात येत आहेत. शासनाच्या महामार्ग विभागाकडून मक्तेदारामार्फत ही कामे करण्यात येत आहेत. मक्तेदाराने या रस्त्याची कामे सुरू केली आहेत.

मात्र, अनेक रस्त्यावर कोटिंगचा लेअर टाकण्यात आलेला नाही. केवळ रस्त्यावर खडी व कच टाकला आहे. त्यामुळे वाहनचालकांना वाहने चालविण्यास अडचणी येत आहेत. याबाबत नागरिकांनी महापालिकेत तक्रारी केल्या आहेत.

महापालिकेतर्फेही महामार्ग विभागास रस्त्यांच्या कामांबाबत तीन पत्रे देण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, अद्यापही त्यांचे कोटिंग करून काम पूर्ण करण्यात आलेली नाहीत. याबाबत महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की रस्त्यांची कामे आता चांगल्या पद्धतीने सुरू आहेत.

हेही वाचा : ढोलेरा- ग्रीनफिल्ड सिटी आणि महाप्रचंड औद्योगिक हब...

Road Coating Work Incomplete
KYC Fraud : KYC करण्याच्या नावाखाली ऑनलाईन फसवणूक

काही रस्त्यांवर कोटिंग करण्यात न आल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यानुसार संबंधित मक्तेदारास ताबडतोब कोटिंगचा लेअर टाकण्याचे आदेश दिले आहेत. संबंधित मक्तेदार आणखी एक मशिन लावून कामे वेगाने करणार असून, कोटिंगचे लेअरही लवकरच टाकण्यात येणार आहेत.

बिलाबाबत आयुक्तांना भेटणार
कामांसाठी महापालिकेच्या माध्यमातून निधी येत आहे. आतापर्यंत पाच कोटी ४१ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. आठ कोटींचा निधी शासनाकडून आलेला असतानाही महापालिकेकडून तो प्राप्त झालेला नाही. त्यामुळे मक्तेदारास निधी अदा करता आलेला नाही. या निधीसाठीही महामार्ग विभागाचे अधिकारी महापालिका आयुक्तांना भेटणार असल्याचे सांगण्यात आले.

"शहरातील ज्या रस्त्यावर कोटिंगचा लेअर टाकण्यात आलेला नाही त्या ठिकाणी त्वरित कोटिंग करण्याचे आदेश मक्तेदारांना देण्यात आले आहेत. ते लवकरच त्या रस्त्याचे कोटिंगचे कामे करतील." -गिरीश सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता, महामार्ग विभाग, जळगाव

Road Coating Work Incomplete
Parola Vikas Parva |ऐतिहासिक अन् अध्यात्माची पंढरी : पारोळा तालुका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.