तरसोद-चिखली टप्प्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वेगात  ​

तरसोद-चिखली टप्प्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वेगात   ​
Updated on

जळगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील तरसोद ते चिखली या जळगाव जिल्ह्यातील सुमारे ६३ किलोमीटर लांबीच्या टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. पूल, रेल्वे उड्डाणपूल व बायपासची कामे वगळता ७५ टक्के काम पूर्ण झाले असून, या टप्प्यातील मुख्य रस्ता सज्ज आहे. उर्वरित कामही जुलैपर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे सांगितले जात आहे. 

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर जळगाव जिल्ह्यात दोन टप्प्यांत चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. फागणे-तरसोद आणि तरसोद-चिखली या दोन्ही टप्प्यांतील कामांसाठी दोन स्वतंत्र एजन्सींना मक्ता देण्यात आला. दोन्ही कामे एकाच वेळी सुरू झाली. मात्र, फागणे-तरसोद टप्प्यातील काम रखडले व तरसोद-चिखली टप्प्यातील कामाने वेग घेत दोन वर्षांत मोठा पल्ला गाठला. 

७५ टक्के काम पूर्ण 
तरसोद फाट्यापासून मुक्ताईनगर तालुक्यातील चिखलीपर्यंत, म्हणजे विदर्भातील मलकापूरच्या सीमेपर्यंतच्या टप्प्यातील ६३ किलोमीटर लांबीचे हे काम वेल्स्पन इन्फ्रास्ट्रक्चरला देण्यात आले. या एजन्सीने युद्धपातळीवर काम करत ते पूर्णत्वाकडे नेले आहे. अगदी लॉकडाउनच्या काळातही या कामाची गती वाढवून ते मुदतीत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट कंपनीने ठेवले. कामाची मुदत ऑक्टोबर २०२१ पर्यंत असली तरी हे काम जुलैपूर्वी पूर्ण करण्याचे मक्तेदाराचे उद्दिष्ट आहे. 

ही कामे आहेत बाकी 
सध्या या कामात काही पुलांचे व बायपासचे (वळणरस्ता) काम तेवढे बाकी आहे. त्यात नशिराबाद गावालगतचा अंडरपास, नशिराबादजवळील रेल्वे उड्डाणपूल, साकेगावनजीक वाघूर नदीवरील पुलाची दुसरी बाजू, भुसावळ शहरातील नाहाटा महाविद्यालय चौकातील भुयारी रस्ता, खडका चौफुली व फेकरीजवळील उड्डाणपूल, दीपनगरजवळील पूल, वरणगाव शहराबाहेरून जाणारा वळण रस्ता ही कामे बाकी आहेत. या कामांनीही वेग घेतला असून, चार महिन्यांत ती पूर्ण करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 
 

दृष्टिक्षेपात काम 
टप्पा : तरसोद ते चिखली 
अंतर : ६२.७ किलोमीटर 
खर्च : सुमारे ९४८ कोटी 
कामाची मुदत : ऑक्टोबर २०२१ पर्यंत 
मक्तेदार : वेल्स्पन इन्फ्रा. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.