Jalgaon News : हिंदू-मुस्लिम बांधवांनी घेतली एकतेसाठी शपथ; शांतता समितीची बैठक

Amalner: Sub-Divisional Police Officer Sunil Nandwalkar while guiding the peace committee meeting. Police Inspector Vijay Shinde and others on the platform.
Amalner: Sub-Divisional Police Officer Sunil Nandwalkar while guiding the peace committee meeting. Police Inspector Vijay Shinde and others on the platform.esakal
Updated on

Jalgaon News : आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी येत असल्याने आणि अमळनेर शहरातील दंगलीची पार्श्वभूमी पाहता अमळनेरातील मुस्लिम समाजाने आषाढी एकादशीच्या दिवशी कुर्बानी देणार नाही, असा निर्णय घेतल्याने समाजापुढे एक वेगळा आदर्श घालून दिला आहे.

शांतता समितीत उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील नंदवाळकर यांनी दोन्ही सणांचे निमित्त साधून नवीन पायंडा घालण्याचे आवाहन केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या वेळी उपस्थितांनी शहराच्या सौख्यासाठी एकतेची शपथ घेतली. (Hindu Muslim brothers take oath for unity Peace Committee Meeting Inspector General of Police in Amalner At on Thursday Jalgaon News)

शहरात सुजाण मंगल कार्यालयात सोमवारी सायंकाळी शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील नंदवाळकर म्हणाले, की अमळनेरला इतिहास आहे, त्याला तडा जाऊ देऊ नका, अमळनेरची अस्मिता जपून ठेवा. ९ रोजी झालेल्या दंगलीत साडेतीन ट्रॅक्टर दगड पालिकेने फेकली.

ड्रोन कॅमेऱ्याच्या फुटेजच्या साहाय्याने दगड असलेल्या घरांचे सर्वेक्षण करून त्याचा अहवाल पालिकेने ठेवावा. पोलिसांपेक्षा जनतेची पॉवर मोठी आहे, पण जनतेलाच त्याचा विसर पडला आहे. प्रत्येकाने आपले स्वतःचे घर आणि आजूबाजूचे घर शांत केले तरी दंगल होणार नाही, असे आवाहनही त्यांनी केले.

पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांनी सांगितले, की सर्वच अपेक्षा पोलिसांकडून करण्यापेक्षा समाज म्हणून आपलीही जबाबदारी आहे. दगड फेकणारा जितका दोषी आहे, तितका त्याच्या डोक्यात दगड भरणारा पण आहे. यावेळी प्रा. अशोक पवार, ॲड. ललिता पाटील, ॲड. शकिल काझी, संजय पाटील, आरिफ भाया, प्रवीण पाठक, सचिन पाटील, धनंजय सोनार, रियाज मौलाना आदींनी मनोगत व्यक्त केले. विजय शिंदे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. शरद पाटील सूत्रसंचालन केले. रणजित शिंदे यांनी आभार मानले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Amalner: Sub-Divisional Police Officer Sunil Nandwalkar while guiding the peace committee meeting. Police Inspector Vijay Shinde and others on the platform.
Jalgaon Accident News : मुलीचा गणवेश घ्यायला गेलेल्या पित्याचा अपघातात मृत्यू; कुटुंबीयांचा मन हेलावणारा आक्रोश

बी. जी. शेखर साधणार संवाद

शहरातील दंगलीच्या पार्श्वभूमीवर नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील हे गुरुवारी (ता. २२) दुपारी एकला शांतता समितीची बैठक घेऊन जनतेशी संवाद साधणार आहेत.

अमळनेर शहरात झालेली दगडफेक, पोलिसांवर झालेला हल्ला, न्यायालयीन कोठडीत अशपाकचा मृत्यू आणि पोलिसांवर झालेले आरोप आदींमुळे झालेले समज, गैरसमज यावर प्रकाश टाकण्यासाठी, जनतेचे विचार मनोगत ऐकून मार्गदर्शन करण्यासाठी विशेष पोलिस महानिरीक्षक अमळनेरात येत आहेत.

शहरातील कायदा आणि सुव्यवस्था नीट राहण्यासाठी प्रतिष्ठित नागरिक आणि सर्व स्तरातील नागरिकांनी गुरुवारी दुपारी एकला शांतता समितीच्या बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांनी केले आहे.

Amalner: Sub-Divisional Police Officer Sunil Nandwalkar while guiding the peace committee meeting. Police Inspector Vijay Shinde and others on the platform.
Jalgaon Crime News : अट्टल गुन्हेगार जळगावातुन अटकेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.