Jalgaon News: जमिनीवरची नोट पापण्यांनी उचलतात होलार बांधव; खानदेशातील अनोखी कला

लहान डफ थोड्या फिट बांधल्याने त्याचा आवाज टणक स्वरूपात येतो. एका टीम मध्ये तीन चार डफ वाजविणारे व दोन तीन जण पिपाणी वाजविणारे असतात
While playing the tambourine, holar while picking up money note on ground with eyelids.
While playing the tambourine, holar while picking up money note on ground with eyelids.
Updated on

Jalgaon News : मरण असो वा तोरण धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात होलार बांधवांचे वाद्य दिसून येते.

त्यांची नवी पिढी आता या व्यवसायात आली असून वाद्य वाजवितांनाच परातीतील पाण्यातील नोट व जमिनीवरचे सुटे नाणे, दहा,वीस रुपयांची नोट ते डोळ्याच्या पापण्यांनी किंवा कानात घालून सहज उचलतात. (holar pick up money note on ground with eyelids While playing tambourine jalgaon news)

त्यांची ही कला सध्या खानदेशात कौतुकाचा विषय ठरत आहे. जळगाव जिल्ह्यात कमी असले तरी धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात लग्न समारंभ, साखरपुडा, मिरवणूक, गवळण यासह अंत्ययात्रेत होलार बांधवांचे वाद्य दिसून येते. पाच ते पंधरा हजार रुपये घेऊन हे बांधव कार्यक्रम पार पाडतात. वाद्यात डफ, पिपाणीसह गाणेही ते गातात. पिपाणी वाजविण्यात जशी जुनी पिढी आहे तसे किशोरवयीन तरुणही आहेत.

होलार बांधव शेजारे, नंदाने, खलणे, कळमसरे ,खरदे, धुळे, दहिवद ,आयने ,सायने, चिंचगव्हान, मालेगाव आदी ठिकाणी होलार बांधवांची घरे आहेत. त्यामुळे खानदेश सह मालेगाव नाशिक, सटाणा आदी भागातही कार्यक्रमासाठी जात असल्याचे राजू होलार, प्रकाश होलार, समाधान होलार, ज्ञानेश्वर होलार, शिवराम होलार यांनी सांगितले.

While playing the tambourine, holar while picking up money note on ground with eyelids.
Jalgaon Corona Update: जिल्ह्यात ‘जेएन १’चा भुसावळ, जळगावला रुग्ण; दोघांनाही सौम्य लक्षणे

लहान डफ थोड्या फिट बांधल्याने त्याचा आवाज टणक स्वरूपात येतो. एका टीम मध्ये तीन चार डफ वाजविणारे व दोन तीन जण पिपाणी वाजविणारे असतात. वाजता वाजताच कोलांट उडी मारत ते जमिनीवरील परातीतील पाण्यातील नोट ते पापाणीत किंवा कानात धरून उचलतात. त्यांची ही कला नवीन पिढीत अधिक प्रकारात सादर करण्यात तरुण निपुण होत आहेत.

"आमच्या समाजात शिक्षण कमीच असून परंपरागत हे वाद्य शिकून नवीन पिढीही याच व्यवसायात येत आहे.खानदेश सह बाहेरील भागातही आम्ही कार्यक्रमासाठी जात असतो"- .राजू होलार

While playing the tambourine, holar while picking up money note on ground with eyelids.
Jalgaon New Voter: जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या 22 हजारांनी वाढली; जनजागृतीचा परिणाम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.