Jalgaon News : केळी विकास महामंडळाची लवकरच स्थापना; फलोत्पादन मंत्र्यांची घोषणा

Sandipan Bhumre
Sandipan BhumreSakal
Updated on

Jalgaon News : पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याने मंजूर झालेल्या केळी महामंडळाची स्थापना लवकरच करण्यात येणार असल्याची घोषणा शुक्रवारी (ता. २१) राज्याचे फलोत्पादन आणि रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे यांनी विधान परिषदेत केली.

पालकमंत्री पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदे व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्याशी चर्चा केली. पालकमंत्री पाटील यांनी केळी विकास महामंडळाच्या स्थापनेसाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. (Horticulture Minister announces establishment of Banana Development Corporation soon jalgaon news)

त्यांनी केलेल्या प्रयत्नांनी केळी विकास महामंडळाला मुख्यमंत्र्यांनी जळगाव दौायात १०० कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली होती.

राज्य शासनातर्फे यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आलेली नव्हती. मध्यंतरी पालकमंत्री पाटील यांनी नियोजित केळी विकास महामंडळाला दिवंगत नेते हरिभाऊ जावळे यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांकडे केली आहे. याबाबत लवकरच घोषणा करण्यात येणार असल्याचे मंत्री भुमरे म्हणाले.

दरम्यान, या अनुषंगाने विधानपरिषदेत शुक्रवारी केळी विषयावर चर्चा झाली. यावर राज्याचे फलोत्पादन व रोजगार हमी मंत्री भुमरे यांनी केळी विकास महामंडळ लवकरात लवकर अस्तित्वात येणार असून, आपली यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली आहे. यामुळे आता लवकरच केळी विकास महामंडळ अस्तित्वात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पन्नास कोटींची तरतूद

पालकमंत्री पाटील यांनी केळी विकास महामंडळाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Sandipan Bhumre
Jalgaon News : अतिरेकी घुसल्याच्या दूरध्वनीने पळापळ; चाळीसगाव रेल्वेस्थानकावरील थरार...

लवकरच महामंडळ कार्यरत होणार असून, त्यासाठी पहिल्या टप्प्यात साधारणपणे ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे, तसेच अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह एकूण १५ जणांची नियुक्तीही करण्यात येणार आहे.

दरम्यान, राज्य सरकारने केळी विकास महामंडळाची स्थापना केल्याची बाब जळगाव जिल्ह्यासाठी खूप महत्त्वाची आहे. जळगाव जिल्हा केळीचे आगार म्हणून प्रसिद्ध आहे. केळी उत्पादकांना अनेक समस्या भेडसावतात. त्यांचे निराकरण करण्यासाठी एकाच ठिकाणी संशोधनासह मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.

त्यांनी पहिल्यांदा यासंदर्भात प्रस्ताव पाठवून मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा घडवून आणली. नंतर हे महामंडळ प्रत्यक्षात साकारावे, यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. यामुळे महामंडळाच्या स्थापनेबाबत फलोत्पादन मंत्र्यांनी अधिकृत घोषणा केली.

"केळी विकास महामंडळाच्या स्थापनेसाठी प्रस्ताव पाठविण्यापासून ते प्रत्यक्ष साकार होण्यापर्यंत माझा पाठपुरावा सुरू राहणार आहे. दोन महिन्यांत हे महामंडळ प्रत्यक्ष साकारण्यात आलेले असेल, असा मला विश्‍वास वाटतो." -गुलाबराव पाटील, पालकमंत्री

Sandipan Bhumre
Jalgaon District Collector : जळगाव जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सीईओंची बदली; यांची नियुक्ती..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.