Jalgaon Fire Accident : गॅस सिलिंडरच्या भडक्याने गणेश कॉलनीत घराला आग; गृहिणीच्या प्रसंगावधानाने टळला अनर्थ

Jalgaon Fire Accident : गॅस सिलिंडरच्या भडक्याने गणेश कॉलनीत घराला आग; गृहिणीच्या प्रसंगावधानाने टळला अनर्थ
sakal
Updated on

Jalgaon Fire Accident : गणेश कॉलनी परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरने अचानक पेट घेतल्याने आग लागल्याची घटना मंगळवारी (ता. ३) पहाटे साडेसहाच्या सुमारास घडली.

दरम्यान, केशर प्रजापती या धाडसी गृहिणीने जीवाची पर्वा न करता धगधगत्या आगीत शिरून सिलिंडरचा कॉक बंद केल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र या आगीत संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. (house caught fire in Ganesh Colony due to gas cylinder explosion jalgaon fire accident )

गणेश कॉलनीत गणेश प्रजापती हे कुटुंबियांसह भाडेतत्त्वावरील खोलीत वास्तव्यास आहेत. खाद्य पदार्थांची गाडी लावून ते कुटूंबीयांचा उदरनिर्वाह चालवतात. मंगळवारी सकाळी ते नाष्ट्याची गाडी घेवून जाण्याची तयारी करत होते.

त्यावेळी अचानक खोलीतील गॅस सिलिंडरचा भडका उडाला. गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवलेले होते. काही कळायच्या आतच संपुर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. संपूर्ण घरात ही आग पसरली. त्यावेळी त्यांच्या पत्नी केशर प्रजापती यांनी थेट आगीमध्ये धाव घेत सिलिंडरचा कॉक बंद केला.

Jalgaon Fire Accident : गॅस सिलिंडरच्या भडक्याने गणेश कॉलनीत घराला आग; गृहिणीच्या प्रसंगावधानाने टळला अनर्थ
Fire Accident: लग्न समारंभात लागलेल्या आगीत १०० जणांचा दुर्दैवी मृत्यू; तर नववधू, वरासह १५० जण जखमी

अन्यथा या आगीत सिलिंडर फुटून इतर घरांनाही धोका निर्माण झाला असता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. घरासमोर राहणारे दिलीप शिंपी यांनी तत्काळ अग्नीशमन विभागाला माहिती दिली. त्यावर तेथे एक बंब दाखल झाला व आग आटोक्यात आणून सिलिंडर बाहेर काढण्यात आले.

अग्निशमन विभागाचे चालक देविदास सुरवाडे, संतोष तायडे, भगवान पाटील यांनी आग अटोक्यात आणण्यासाठी मदत केली. आगीत रॅकवर ठेवलेल्या प्लॅस्टिकच्या बरण्यांसह भांडे, कपडे व अन्य साहित्य जळून खाक झाले असून, प्रजापती कुटुंबीयांचा संसार उघड्यावर आला आहे.

Jalgaon Fire Accident : गॅस सिलिंडरच्या भडक्याने गणेश कॉलनीत घराला आग; गृहिणीच्या प्रसंगावधानाने टळला अनर्थ
Nashik Fire Accident : अंबड औद्योगिक वसाहतीतील गोदामांना भीषण आग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.