Jalgaon Fire Accident : शॉर्ट सर्किटने घराला आग; संसारोपयोगी साहित्य जळून खाक

एका घरात शॉर्टसर्किटमुळे आग लागून घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना रविवारी (ता. २४) घडली. या घटननेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.
fire ( file photo )
fire ( file photo )Sakal
Updated on

Jalgaon Fire Accident : येथे एका घरात शॉर्टसर्किटमुळे आग लागून घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना रविवारी (ता. २४) घडली. या घटननेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.

याबाबत वृत्त असे, की गावातील दुर्गानगर भागात राहणारे घनश्याम रामेश्वर वैराळे यांच्या घरात आज सकाळच्या सुमारास घरातून तसेच छतावरील डगमधून मोठा धूर निघत असल्याचे शेजारच्यांच्या लक्षात आले. (House fire due to short circuit jalgaon news)

काही वेळातच घरात आग लागल्याचे समजताच एकच धावपळ उडाली. घरात आग लागली त्यावेळी घरमालक घनःश्याम वैराळे हे घराच्या शेवटच्या टप्प्यात झोपलेले होते. ग्रामस्थांनी त्यांना आवाज दिल्यानंतर ते जागे झाले. मात्र, तोपर्यंत संपूर्ण घरात धूर झालेला होता. स्वयंपाक खोलीतील फ्रीजचा अक्षरशः कोळसा झाला होता.

गावातील तरुणांनी वेळीच प्रसंगावधान दाखवत घरमालक वैराळे यांना सुखरूप बाहेर काढले. घरातील वीजपुरवठा खंडीत करून पेट घेतलेले फ्रीज देखील बाहेर काढले. धूर ओसरल्यावर घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याचे दिसून आले.

fire ( file photo )
Jalgaon Fire Accident : अचानक लागलेल्या आगीत संसारपयोगी साहित्य खाक

ज्यात फ्रीजसह घरातील पंखे, विजेचे बोर्ड, भांडी, डबे, त्यातील कडधान्य, कपडे, अंथरुण, पांघरुणसह सर्व संसारोपयोगी वस्तूंचा समावेश आहे. या घटनेत श्री. वैराळे यांचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

मोलमजुरी करणारे हे कुटुंब या घटनेमुळे हताश झाले आहे. ही घटना विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. यामुळे घनश्याम वैराळे व त्यांच्या आई शोभाबाई वैराळे यांना अश्रू अनावर झाले होते.

fire ( file photo )
Jalgaon Fire Accident: पारोळ्यात नगरसेवक जगदाळेंच्या घराला आग; कोट्यवधीची हानी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.