Jalgaon News : शहरात भररस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. अगदी महापालिकेसमोरच बेशिस्त पार्किंग होत आहे. त्यामुळे झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा बळीही गेला.
मात्र, महापालिका त्याबाबत कोणतीही हालचाल करण्यास तयार नाही. कारवाईसाठी महापालिकेला आणखी किती बळी हवे आहेत, असा प्रश्न शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक ॲड. दिलीप पोकळे यांनी उपस्थित केला आहे.
याबाबत महापौर बेजबाबदार आहेत. तत्काळ कारवाई केली नाही, तर आपण संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून आंदोलन करणार आहोत, असा इशारा नगरसेवक ॲड. पोकळे यांनी दिला.(How many victims of encroachment unauthorized parking Adv. Pokle question file a case against officers Jalgaon News)
याबाबत प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की काही महिन्यांपासून नेहरू चौक ते टॉवर चौक रस्त्यावर अपघाती मृत्यू झाले आहेत. मंगळवारीही (ता. २०) एका तरुणाला आपले प्राण अगदी महापालिकेसमोर अपघातात गमवावे लागले.
या अपघाताचे एकमेव कारण म्हणजे या रस्त्यावरील अतिक्रमण व बेशिस्तपणे उभी राहणारी वाहने. भररस्त्यावर चारचाकी, दुचाकी उभ्या केल्या जातात. त्यामुळे हा रस्ता अत्यंत अरुंद झाला आहे. शिवाय या रस्त्यावर अनधिकृत विक्रेत्यांनी अतिक्रमणही केले आहे.
या रस्त्यावर नेहमी चारचाकी गाड्या लावलेल्या असतात. नटवर टाकी चौक, जुनी जिल्हा बँक येथे तर अतिक्रमणाने रस्त्याला वेढाच घातला आहे. त्या ठिकाणी भररस्त्यावर बाजार भरतो. त्या वेळी वाहने काढण्यासाठीही जागा शिल्लक राहत नाही. त्यामुळे नेहमी अपघात होत असतात.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
महापौर बेजबाबदार
महापौरांनी शहरातील अतिक्रमणाकडे लक्ष देण्याची गरज आहे. नागरिकांचे जीव जात असताना महापौर जयश्री महाजन यांचे मात्र दुर्लक्ष होत आहे. अतिक्रमण व बेशिस्त पार्किंगवर कारवाई करण्याबाबत कोणतेही गांभीर्य दिसत नसल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला.
अनधिकृत पार्किंगवर कारवाई करावी
महापालिकेजवळ मोठ्या प्रमाणात अनधिकृत पार्किंग करण्यात येत आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. या अनधिकृत चारचाकी वाहन पार्किंगवर कारवाई करावी व या रस्त्यावरील अतिक्रमणावरही कारवाई करावी, अन्यथा आपण संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार आहोत, तसेच आंदोलनही करणार आहोत, असा इशारा ॲड. पोकळे यांनी दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.