अनेकदा पाचोड परिसरासह तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या २६४ व खाजगी १३५ शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या खिचडीमध्ये अळ्या, उंदरांच्या लेंड्या निघाल्याच्या घटना घडल्या.
पाचोड : खिचडीऐवजी पौष्टिक आहार म्हणून दिलेल्या बिस्किटातून (Biscuit) शंभरावर विद्यार्थ्यांना (School Students) विषबाधा झाल्याने सर्वांना पाचोड (ता. पैठण) येथील ग्रामीण रुग्णालयात (Rural Hospital) उपचारार्थ दाखल करण्यात आल्याची घटना केकत जळगाव (ता. पैठण) येथे शनिवारी (ता. १७) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली.