Jalgaon News : धक्कादायक! दुसरीही मुलगी झाल्याने त्याने पत्नीचा केला खून अन् केली आत्महत्या

crime news
crime newsesakal
Updated on

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : दुसरीही मुलगीच जन्माला आली म्हणून हाताश झालेल्या पतीने आपल्या पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करत तिचा खून केला तर त्याने देखील धावत्या रेल्वेखाली आपला जीव देऊन आत्महत्या केल्याची घटना चाळीसगाव शहरातील जुना कारगाव रोड भागात घडली. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime news
Jalgaon Crime News : भाऊबंदकीतील क्षुल्लक वादातून काकाने केला पुतण्याचा खून

चाळीसगाव शहरातील जुना करगाव रोड भागालगत असलेल्या जय गणेशनगरमध्ये वास्तव्यास असलेल्या सुरज दिलीप कुऱ्हाडे (वय २८) व रेश्मा सुरज कुऱ्हाडे (वय २४) हे दोन्ही पती, पत्नी हे आपला संसार गुण्यागोविंदाने करत होते. दोघेही रस्त्याचे खड्डे खोदण्याचे काम करून पोटाची खळगी भरत होते. त्यातच सुरजला दारुचे व्यसन जडले होते.

दुसरी मुलगी झाल्याचे दु:ख

सुरज व रेश्माला पहिली दीड वर्षांची मुलगी होती. त्यातच सुरजला दारुचे व्यसन जडले होते. या दारुच्या व्यसनाने पती, पत्नीचे नेहमी वाद व्हायचे. त्यातच रेश्माला दुसरीही मुलगी झाल्याने तिचा पती सुरज हा खूप दुःखी झाला. जन्माला आलेली दुसरी मुलगी तीन महिन्याची झाल्यानंतर सुरज त्या मुलीला व पत्नीला घेण्यासाठी २५ नोव्हेंबरला जुणोवने (ता. धुळे) येथे गेला व आपल्या सासरवाडीला दोन दिवस थांबला. त्यानंतर तो २८ नोव्हेंबरला आपल्या घरी चाळीसगाव येथे पत्नी व मुलींना घेऊन आला.

हेही वाचा: आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

पत्नीला संपवले

सुरज व रेश्मा यांनी नेहमीप्रमाणे जेवण केले. सुरज हा दारू प्यायलेला होता. बुधवारी (ता.३०)पहाटे लहान मुलीचा रडण्याचा आवाज येत असल्याने शेजारी राहात असलेले त्याच्या नातेवाईकांनी घरात जावून पाहिले असता रेश्मा रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळून आली. रेश्माच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून तिला ठार करण्यात आले होते. त्या ठिकाणी सर्व नातेवाईक आल्यानंतर त्यांनी ही घटना रेश्माच्या माहेरी जुणोवने (ता.धुळे) येथे सांगितली. परंतु तिचा पती सुरज हा तेथे नसल्याने सर्वजण चक्रावून गेले. मात्र या दोन्ही मुली आई, वडिलांच्या प्रेमाला पोरक्या झाल्या आहेत.

crime news
Jalgaon News : झोक्याचा स्टंट बेतला जिवावर; गळ्यात दोर आवळून तरुणीचा करुण अंत

सुरजने रेल्वेखाली दिले झोकून

सुरज राहत असलेल्या घरापासून काही अंतरावर धुळे रेल्वेरुळावर रेल्वेच्या खाली एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्या ठिकाणी जमलेले सर्व नातेवाईक त्या दिशेने पळत गेल्यावर तो मृतदेह हा सुरजचा असल्याने एकच खळबळ उडाली. सुरज याने आधी आपल्या पत्नीला संपवले व नंतर त्याने स्वतः रेल्वे खाली आपला जीव देऊन आत्महत्या केली. या प्रकरणी रेश्माचा भाऊ प्रताप गायकवाड याने दिलेल्या तक्रारीवरून चाळीसगाव शहर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.