Jalgaon Crime News : हतनूरला पतीकडून पत्नीचा खून; संशयित पती पोलिसांच्या ताब्यात

Jalgaon Crime News : हतनूरला पतीकडून पत्नीचा खून; संशयित पती पोलिसांच्या ताब्यात
Updated on

Jalgaon Crime News : हतनूर (ता. भुसावळ) येथील शेतशिवारात पती-पत्नीच्या किरकोळ वादातून पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना सोमवारी (ता.१८) पहाटे घडली. यामुळे घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, वरणगाव पोलिसांनी पतीला अटक केली आहे.

भुसावळ तालुक्यातील हतनूर येथील शेतशिवारात जितेंद्र गंगाराम हेमब्रम हा पत्नी शांतीदेवी जितेंद्र हेमब्रम हे दांपत्य या ठिकाणी वास्तव्यास आहे. ( husband kills wife in hatnur jalgaon news)

आपल्या शेतातील घरात हे दांपत्य राहात असून, या दोघांमध्ये रात्री वाद झाला. या वादावेळी पती जितेंद्र याने दारूच्या नशेत पत्नी शांतादेवी हिला लाथाबुक्यांनी मारहाण करून तिचा गळा आवळल्याने शांतीदेवी (वय अंदाजे ४० ते ४५) हिचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती वरणगाव पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे साक्षीदार व मृत शांतादेवी यांनी संशयित पतीची दारू पिल्याने त्याचा पतीला राग आल्याच्या कारणावरून घटना घडल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Jalgaon Crime News : हतनूरला पतीकडून पत्नीचा खून; संशयित पती पोलिसांच्या ताब्यात
Jalgaon Crime: चिन्या जगताप खून प्रकरणी फरारींपैकी दोघांना अटक; जेलर पेट्रीस गायकवाडसह इतरांचा शोध सुरु

हे दांपत्य उत्तरप्रदेश राज्यातील राजकिशन कॉलनी शक्तीनगर (ता. शक्तीनगर, जि. सोनभद्र) येथील आहे.

ते एका शेतकऱ्याकडे कामाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. पत्नीचा मारेकरी जितेंद्र यास पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले. शांतीदेवी यांचा मृतदेह पोलिसांनी तपासणीसाठी पाठविला आहे. वरणगाव पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, सहाय्यक निरीक्षक आशिषकुमार आडसूळ, उपनिरीक्षक परशुराम दळवी, किशोर पाटील तपास करीत आहेत.

Jalgaon Crime News : हतनूरला पतीकडून पत्नीचा खून; संशयित पती पोलिसांच्या ताब्यात
Jalgaon Crime: पोलिसाला धक्का मारून पळणाऱ्या कैद्यास पकडले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.