नवरा-बायकोसह नातेवाईकांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी

पत्नीने तक्रारीत मारहाणीसह पैसे हिसकविल्याचे सांगितले आहे.
husband-beats-his-wife
husband-beats-his-wifeesakal
Updated on

जळगाव : कौटुंबिक वादातून नवरा-बायकोसह त्यांच्या नातेवाइकांनी एकमेकांना शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना घडली. जिल्हापेठ पोलिस ठाण्यात या प्रकरणी परस्परविरोधात गुन्हे दाखल झाले आहे. पत्नीने तक्रारीत मारहाणीसह पैसे हिसकविल्याचे सांगितले आहे.

कृष्णवर्धन राजेंद्र पाटील व त्यांची पत्नी हर्षा कृष्णवर्धन पाटील यांच्या गेल्या काही महिन्यांपासून वाद असल्याने दोघे विभक्त झाले आहे. पत्नी हर्षा पाटील या मुंबईला वास्तव्यास असून त्यांनी खावटीसाठी बी. जे. मार्केट येथील कौटुंबिक न्यायालयात दावा दाखल केला आहे. खटल्याच्या कामकाजासाठी त्या मंगळवारी (ता. ७) जळगावी आल्या होत्या. न्यायालयात तारीख असल्याने पती-पत्नीसह उभयपक्षाचे नातेवाईक बी. जे. मार्केट येथील न्यायालयात पोहचले. दोन्ही गट आणि विभक्त पती-पत्नी समोरा-समोर आल्याने दुपारी ४ वाजेच्या सुमारास काहीही कारण नसताना कुष्णवर्धन आणि पत्नी हर्षा पाटील यांच्यात वादाला सुरवात झाली. वादात दोन्ही कुटुंबीयांनी भाग घेत यथेच्छ शिवीगाळ आणि माहराण करण्यात आली. जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री परस्पर विरोधात तक्रारीवरुन कृष्णवर्धन राजेंद्र पाटील, सुनिता राजेंद्र सोनवणे, (दोन्ही रा. गुजराल पेट्रोल पंप), कृष्णवर्धन पाटील यांचा मित्र (नाव गाव माहित नाही), हर्षा कृष्णवर्धन पाटील, गुलाब गोरख पाटील (दोन्ही रा. गणराज कॉलनी, मुंबई) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर पवार करीत आहे.

husband-beats-his-wife
अखेर पत्नीचा संशय ठरला खरा
husband-beats-his-wife
जळगावातून अपहरणानंतर तरुणाचा मध्यप्रेदशात खुन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.