ते आले... जमिनीवर बसले... अन्‌ ग्रामस्थांची मने जिंकली !

‘डोक्यात हवा गेलेल्या आयएएस अधिकाऱ्यांनी या आदर्श अधिकाऱ्यांकडून बोध घ्यावा’ असा सल्लाही नेटकरी या घटनेवरुन देताना दिसत आहेत.
IAS, IPS officers interact with villagers
IAS, IPS officers interact with villagersesakal
Updated on

अमळनेर (जि. जळगाव) : एकीकडे आपल्या पाळीव कुत्र्याला फिरविण्यासाठी स्टेडियम रिकामे करणारे ‘आयएएस अधिकारी दांपत्य’ चर्चेत आले अन्‌ त्याची दखल घेत तडकाफडकी बदलीही करण्यात आली. सोशल मीडियावर ही घटना ट्रोल होत असतानाच चांगली बाबही नेटकऱ्यांच्या नजरेतून सुटली नाही. आता काही दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यातील एका ग्रामीण भागातील कार्यक्रमात आयएएस (IAS), आयआरएस (IRS) अधिकारी यांनी खुर्ची, मानपान, सत्कार सोडून चक्क जमिनीवर भारतीय बैठक मारली. हे फोटो सोशल मीडियावर (Social media) शेअर केले जात आहे. अन्‌ त्यात ‘डोक्यात हवा गेलेल्या आयएएस अधिकाऱ्यांनी या अशा आदर्श अधिकाऱ्यांकडून बोध घ्यावा’ असा सल्लाही नेटकरी देताना दिसत आहेत.

ताडे (ता. एरंडोल) येथे काही दिवसांपूर्वी लोकचळवळीतून जलसंधारणबाबत महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला आशिया खंडातील सर्वात मोठ्या व श्रीमंत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील, ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयचे सहआयुक्त डॉ. उज्वलकुमार चव्हाण व नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे उपसंचालक कपिल पवार हे तिन्ही प्रशासनातील उच्च पदस्थ अधिकारी गावात येणार होते, म्हणून गावकरी कमालीचे उत्साहात होते. टेबल, खुर्ची, दिपप्रज्वलन, हार, फुले, शाली- श्रीफळ याची संपूर्ण तयारी केली होती. थोड्याच वेळात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील व सक्तवसुली संचालनालयचे सहआयुक्त डॉ. उज्वलकुमार चव्हाण हे आले. गावकऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. त्यांच्यासोबत उपसंचालक कपिल पवार हे देखील होते. सर्वांच्या नजरा त्या अधिकाऱ्याकडेच होत्या.

IAS, IPS officers interact with villagers
चोऱ्या रोखण्यासाठी उपयुक्त ठरेल हा कॅमेरा; किंमत फक्त....

...अन्‌ घडले अजबचं

पाहुणे मंडळी मंचाकडे गेलेत अन्‌ सरळ गावकऱ्यांसोबत मांडी घालून जमिनीवर बसले. ना शाल.. ना श्रीफळ... ना सत्कार... सर्वच औपचारिकता बाजूला ठेवली. ‘आयएएस’ व ‘आयआरएस’ अधिकाऱ्यांचा हा साधेपणा अन्‌ विनम्रपणाचा अनोखा ‘प्रोटोकॉल’ पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. अन्‌ हे पाहून पुन्हा टाळ्यांचा कडकडाट वाढला. चाळीसगाव तालुक्यात यशस्वी झालेली ‘मिशन ५०० कोटी जलसाठा चळवळ’ एरंडोल तालुक्यात पोहोचवण्यासाठी राजेश पाटील यांनी आपल्या जन्मभूमीत ही बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीतील फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

IAS, IPS officers interact with villagers
धक्कादायक! 11 वर्षांपासून जन्मदात्या बापाकडून मुलीवर लैंगिक अत्याचार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.