Ideal Marriage : पारंपरिक रूढी, परंपरांना आळा; भिल्ल समाजाचा आदर्श विवाह!

Groom Nitin Malche and bride Aarti Sonwane at a typical Bhil wedding.
Groom Nitin Malche and bride Aarti Sonwane at a typical Bhil wedding. esakal
Updated on

Jalgaon News : मारवड येथील आदिवासी भिल्ल समाजाने पारंपरिक रूढी, परंपरा, अनावश्यक खर्चाला आळा घालत आदर्श विवाह लावून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. (ideal marriage of Bhil community by avoiding traditional customs and traditions jalgaon news)

मारवड येथील नितीन दगडू मालचे या तरुणाचे वडील दिव्यांग आहेत. आई मजुरी करते, भाऊ बँड पार्टीत कामाला जातो. तो स्वतः देखील मजुरी करतो. त्याने गावातील पितृछत्र हरपलेल्या आणि फारकत झालेल्या आरती युवराज सोनवणे हिला आपली जीवनसाथी बनविण्याचा निर्णय घेतला आणि लग्न ठरले.

आदिवासी भिल्ल समाजात हळदीच्या दिवशी नातेवाईकांची गर्दी, बँड, नाच-गाण्याची धूम असते. मात्र दोन्ही कुटुंबांनी परिस्थितीची जाणीव ठेवून एकत्रित विचार केला. रूढी, परंपरांना फाटा देत साध्या पद्धतीने लग्न लावण्याचे ठरवले. दोन्ही घरातील प्रत्येकी दहा लोक हजर होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Groom Nitin Malche and bride Aarti Sonwane at a typical Bhil wedding.
Marriage Horoscope : कोणत्या वयात होईल तुमचं लग्न? तुमची रास सांगेल उत्तर

गल्ली अथवा कोणत्याच नातेवाईकांना न बोलवता बिना वाजंत्रीची हळद लावली. दुसऱ्या दिवशी बँड नाही, घोडा नाही आणि वरात देखील न काढता नवरदेवाला दुचाकीवर बसवून मारुती मंदिरावर नेले आणि छोट्याशा मंडपात आणले.

जेवणाचा खर्च देखील नको म्हणून फक्त मसाले भाताचा बेत आखला आणि शांततेत आदर्श विवाह पार पडला. आदिवासी भिल्ल समजाने रूढी, परंपरा, वायफळ खर्च वाचवून आदर्श विवाह केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

Groom Nitin Malche and bride Aarti Sonwane at a typical Bhil wedding.
Women Marriage : महिलेचा अजब कारभार! नवऱ्यासोबत घटस्फोट घेतला अन् तरूणीसोबत केलं दुसरं लग्न

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.