जळगाव : शहरातील मुस्लीम कब्रस्तान व ईदगाह ट्रस्टतर्फे संचलित कार्यकारिणीचा कार्यकाळ पूर्ण होऊन नवीन निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.
हा निवडणूक कार्यक्रम वक्फबोर्डाने जाहीर करणे अपेक्षित असताना चक्क मुस्लीम कब्रस्तान ट्रस्टच्या वतीने जाहीर करण्यात आल्याने त्यावर जळगाववासीयांनी तीव्र आक्षेप नोंदविला आहे. (Idgah Cemetery Executive Election Program Illegal Complaints in writing directly to Waqf Board Chairman by Email Jalgaon)
तक्रारदार मतीन शब्बीर पटेल यांच्या वतीने ५ डिसेंबर २०२३ ला राज्य वक्फ बोर्डाचे चेअरमन वजाहत मिर्झा यांना ई-मेलद्वारे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
त्या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे जळगाव येथील मुस्लीम कब्रस्तान व ईदगाह ट्रस्टच्या कार्यकारिणीचा कार्यकाळ पूर्ण झालेला असून नव्या निवडणुकांसाठी सदस्य नोंदणी अपेक्षित होती.
मात्र, संबंधित पदाधिकाऱ्यांनी आपल्या सोयीनुसार वॉर्डरचना ठरवून घेत शहरातील मोठ्या रहिवासी वस्त्या असलेल्या परिसरांना चक्क वगळण्यात आले आहे.
तसेच या परिसरातून सदस्य नोंदणीसाठी येणाऱ्या मुस्लीम बांधवांना योग्यता असल्यावर सदस्यही करवून घेतले जात नाही.
तक्रारदारांनी नमूद केल्याप्रमाणे, सालारनगर, शिवाजीनगराचा विस्तारित भाग असलेला उस्मानिया पार्क, सुप्रिम कॉलनी, पिंप्राळा, रहीम नगर, रामनगर,फातेमा नगर,गणेश पुरी, हाजी अहमदनगर, केजीएन.पार्क, खतफॅक्ट्री अशा विवीध रहिवासी वस्त्यांमधील मुस्लीम बांधवांना साधे सभासदत्वही देण्यात येत नसल्याने त्यांना निवडणुकीपासूनही वंचित ठेवण्यात येत आहे.
आदी सर्व बाबी गंभीर स्वरूपाच्या असून या बाबत तत्काळ दखल घेत जळगाव इदगाह ट्रस्टचा निवडणूक कार्यक्रम कायदेशीर नसल्याने तत्काळ थांबवण्यात यावा, राज्य वक्फबोर्डाने स्वतः या निवडणुकांबाबत जाहीरनामा प्रसिद्ध करावा,
अशी मागणी करण्यात आली असून या तक्रार अर्जावर मतीन शब्बीर पटेल, फारुख कादरी, ईसा शेख, वसीम पटेल, आबिद शेख, अमजद लाला, साहिल पठाण, रझाक पटेल आदींच्या स्वाक्षऱ्या आणि मोबाईलनंबरनीशी ही तक्रार करण्यात आली असून तत्काळ दखल घेण्याची मागणी तक्रारदारांनी केली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.