Jalgaon News : खोदकाम करताना आढळली बारा ज्योतिर्लिंगांची मूर्ती

idol of 12 Jyotirlingas was found while digging in jalgaon news
idol of 12 Jyotirlingas was found while digging in jalgaon newsesakal
Updated on

Jalgaon News : देव्हारी -आडगाव शिवारातील वाघ्या बर्डीजवळ शिवराम महाजन यांची शेती आहे. शिवराम महाजन व त्यांची पत्नी शोभाबाई महाजन हे शेतात वास्तव्याला आहेत.

त्यांनी आपल्या शेतात महादेवाच्या पिंडाची स्थापना करण्यासाठी खोदकाम सुरू केले होते. हे खोदकाम करीत असताना त्यांना पुरातन बारा ज्योतिर्लिंगांची मूर्ती आढळून आली. (idol of 12 Jyotirlingas was found while digging in jalgaon news)

त्यांनी मूर्तीचे दर्शन घेतले. ते त्यांच्या सासऱ्याच्या घरी घेऊन गेले. बारा ज्योतिर्लिंगांची मूर्ती पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. काहींनी मूर्ती पंचधातूची असल्याचे सांगितले. काहींनी पितळाची असल्याचे सांगितले.

सोमवारच्या दिवशी महादेवाच्या पिंडाची नंदीची तसेच त्या बारा ज्योतिर्लिंगाची स्थापना करण्यात आली. शैलेश महाराज कासोदेकर यांच्या मंत्र उच्चारणे ११ जोडप्यांनी होमपूजन केले. गावातील बातमी समजल्यानंतर अनेकांनी दर्शनाचा लाभ घेतला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

idol of 12 Jyotirlingas was found while digging in jalgaon news
Jalgaon News : भुसावळ पालिका वित्त आयोगाचे बँक खाते ‘सील’; आरोग्य, इलेक्ट्रिकल विभागाचे व्यवहार ठप्प

त्यांचे जावई रमेश महाजन अनिल महाजन आनंदा महाजन मुली कविता महाजन, योगिता महाजन उज्ज्वला महाजन, मुलगा दत्तात्रय महाजन व भाच्या नितीन महाजन तसेच लक्ष्मण पाटील यांचे सहकार्य लाभले.

पुढे लोकवर्गणीतून महादेवाचे मंदिर बांधण्यात येईल. वर्गणी न जमल्यास शिवराम महाजन यांचे जावई रमेश महाजन व मुलगी कविता महाजन हे स्वखर्चाने बांधून देणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

idol of 12 Jyotirlingas was found while digging in jalgaon news
Ganeshotsav 2023 : कायद्याच्या चौकटीत राहून सण साजरे करा; सलोखा, भाईचारा जपण्याचे पोलिसांचे आवाहन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.