जळगाव : स्वातंत्र्यसेनानी मीर शुक्रूल्ला उद्यानात खुलेआम सट्टा सुरू असल्याची बातमी प्रसिद्ध झाल्यावर जिल्हापेठच्या कर्तबगार पथकाने सायंकाळी छापेमारी केली. सट्ट्याचा अड्डा तर सापडला नाही. मात्र, वाहनांमध्ये स्वयंपाक गॅस भरणारा बेकादेशीर पंप आढळून आला.
गुन्हा दाखल अटक अन् जप्तीत पोलिसांनी वगळलेल्या रिक्षावरील गॅसपंपाद्वारे हा अड्डा १२ तासांतच सुरू झाला असून, पोलिसांनी नेमके काय जप्त केले अन् कारवाई तरी काय झाली? यावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मीर शुक्रूल्ला उद्यानाच्या मोकळ्या जागेवर खुलेआम सट्ट्याचा अड्डा चालविला जात असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर डीवायएसपी संदीप गवळी यांच्या सूचनेवरून सहाय्यक निरीक्षक किशोर पवार पोलिस गाडीसह धडकले. (illegal business is again running at gas pump on auto rickshaws excluded from action by the Zilla Peth police Jalgaon Crime News)
पोलिस येण्यापूर्वीच टीप मिळाल्याने सट्ट्याच्या अड्ड्यावर काहीच सापडले नाही. जाता जाता मात्र उद्यानातील एका झोपडीबाहेर रिक्षांची लांबच लांब रांग लागल्याचे दिसल्याने पोलिसांनी चौकशी केली असता, बेकायदेशीर स्वयंपाक गॅस वाहनांमध्ये भरून दिला जात असल्याचे दिसून आले. पोलिस पथकाने तडक कारवाई करत आरिफ अल्ताफ हुसेन (वय ५७, रा. गेंदालाल मिल) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून इलेक्ट्रिक मोटार, दोन सिलिंडर जप्त केले. मात्र, गुन्ह्याचे गांभीर्य घालविण्यासाठी गॅसपंप बसविलेली रिक्षा जप्त मुद्देमालातून वगळल्याचा गंभीर प्रकार रविवारी (ता. २७) उघडकीस आला.
सहाय्यक निरीक्षकांचा दावा
वाहनांमध्ये बेकादेशीर गॅस भरताना सापडून आल्याने छाप्यात दोन गॅस सिलिंडर, एक वीजमोटार, असा जवळपास १८ हजार ५०० रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आल्याचे पथकाचे प्रमुख सहाय्यक निरीक्षक किशोर पवार यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. हेच पंचनाम्यात नमूद आहे. दाखल तक्रारीतही त्याचा उल्लेख आढळतो. मात्र, सोयीस्कररिरीत्या वगळलेली मॉडीफायईड ऑटोरिक्षा (जिच्यावरच बेकादेशीर गॅसपंपाची यंत्रणा होती ती) कुठेही आढळत नाही, तसेच ज्या वाहनांमध्ये या पंपातून गॅस भरला जात होता, त्याचाही कुठे उल्लेख आढळत नाही.
हेही वाचा : काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली??
अचानक झाली भयानक कारवाई
या पथकाने गुन्हेगारांना सोयीस्कर (केवळ कागदावरच) कारवाई करून एकप्रकारे गॅसअड्डा चालकाला कायमचे लायसन्स देऊन टाकले. त्याचा परिणाम असा झाला, की कारवाईच्या काही तासांनंतर गुन्हा वाहनांच्या रांगा गॅस भरायला लागलेल्या आढळून आल्या.
मोठ्या जीवितहानीची शक्यता
पैशांच्या हव्यासापायी अवैध धंद्यांची परवानगी देताना किमान सर्वसामान्यांच्या जीविताला धोका पोचणार नाही याची तरी तमा बाळगा, अशीच अपेक्षा जाणकार रहिवाशांची आहे. गेंदालाल मिलचा रहिवासी आसिफ हुसेन शाहूनगरात बेकायदेशीर असुरक्षित पद्धतीने गॅसपंप चालवून रहिवाशांचा धोक्यात टाकतो तरी कुणी त्यास गांभीर्याने घेऊ नये इतका प्रभाव राजकीय कार्यकर्ते, माफियांनी पोलिसांवर निर्माण केला आहे.
...तर भीषण दुर्घटना घडेल!
दहा हजार ८० रुपयांना १४ किलोचे सिलिंडर ग्राहकांना दिले जाते. शाहूनगरातील गोरगरीब हातमजुरी करणाऱ्या कुटुंबाकडून हा सिलिंडर थोडे जास्त पैसे देत खरेदी करत शंभर रुपये किलो दराने विक्री केला जातो. एकेका वेळेला १० ते १५ सिलिंडर झोपड्यात गोळा झालेले असतात. अवघ्या शंभर मीटरवर रहिवासी घरे असून, स्फोट झाला तर प्रशासनाला मृतदेह मोजणे कठीण होईल, अशी परिस्थिती या ठिकाणी आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.