Jalgaon Crime: अवैध वाळू वाहतूक करणारे वाहन ताब्यात; जोगलखेडा-साकेगाव रस्त्यावर पथकाची कारवाई

Board officer Yogita Patil and Talathi while collecting vehicle in Tehsil premises on Sunday.
Board officer Yogita Patil and Talathi while collecting vehicle in Tehsil premises on Sunday.esakal
Updated on

Jalgaon Crime : जोगलखेडा (ता. भुसावळ) येथील वाघुर नदीपात्रातुन अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक तपासणीसाठी साकेगाव- जोगलखेडा रस्त्यावर गस्तीवर असलेले मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल यांच्या संयुक्त पथकाने वाळुचोरीच्या संशयावरून वाहन थांबवले असता, वाहन चालक मजुरांसह पळून गेला.

या वाहनाद्वारे अवैधरित्या वाळूची उत्खनन व वाहतूक होत असल्याचे दिसून आल्याने पथकाने साकेगाव ग्रामस्थांच्या मदतीने संबंधीत वाहन तहसील कार्यलय आवारात जमा केले आहे. (Illegal sand transport vehicle impounded Team action on Jogalkheda Sakegaon road Jalgaon Crime)

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी वाळू माफियांविरुद्ध कंबर कसल्याने सध्या वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे. शनिवारी (ता. ९) असेच एक वाहनातून अवैधरित्या वाळूची उत्खनन व वाहतूक केली जात होती.

उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील व तहसीलदार निता लबडे यांच्या मार्गदर्शनाखालील संयुक्त पथक जोगलखेडा भागात वाघुर नदीपात्रातुन अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक तपासणीसाठी गस्तीवर होते.

त्यावेळी साकेगाव- जोगलखेडा रस्त्यावर मनोज परदेशी (रा. साकेगाव) यांच्या मालकीचे वाहन (एमएच १९, जे ३९५१) साकेगावच्या दिशेने येत होते. वाहन चालकाने पथक दिसताच वाहन रस्त्यावर थांबून मजुरासह पळून गेला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Board officer Yogita Patil and Talathi while collecting vehicle in Tehsil premises on Sunday.
Mumbai Crime News : बंदुकीची मॅगझीन शोधण्यात यलोगेट पोलिसांना यश ; ३ संशयित ताब्यात !

त्यानंतर तहसिलदारांच्या माहितीवरून घटनास्थळी तत्काळ पोलीस मदत पाठवून वाहन तपासले असता त्यात वाळू वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. त्यानुसार वाहन व वाहनतील गौण खनीजाचा पंचनामा केला असता, वाहनात अंदाजे २ ब्रास वाळू होती.

पथकातील कर्मचाऱ्यांनी वाहन ताब्यात घेऊन साकेगाव ग्रामस्थांच्या मदतीने ते तहसील कार्यलय आवारात जमा केले असून, अवैधरित्या वाळूची उत्खनन व वाहतूक केल्याने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ (७) (८) प्रमाणे दंडात्मक कार्यवाहीसाठी प्रस्ताव सादर केला आहे.

मंडळ अधिकारी योगिता पाटील (कुऱ्हे), तलाठी जयश्री पाटील (सुनसगाव), तलाठी साधना खुळे (शिंदी), कोतवाल जितेश चौधरी (साकेगाव) यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Board officer Yogita Patil and Talathi while collecting vehicle in Tehsil premises on Sunday.
Nagpur Crime : दारूच्या नशेत आधारकाठीने केला जन्मदात्या पित्याचा खून

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()