Jalgaon Crime News : साकेगाव शिवारात वाळूचा अवैध साठा; डंपर जप्त

A team of the revenue department while taking action in the case of illegal sand stock.
A team of the revenue department while taking action in the case of illegal sand stock. esakal
Updated on

Jalgaon Crime News : तालुक्यातील साकेगाव शिवारात ग्रामपंचायतीच्या हद्दीत अवैध वाळूसाठा केल्याप्रकरणी मंडळ अधिकारी, तलाठी व कोतवाल यांच्या संयुक्त पथकाने छापा टाकून कारवाई केली.

महसूलच्या पथकाने तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय माहितीच्या आधारे साकेगाव शिवारात ग्रामपंचायतीच्या हद्दीत अवैध वाळूसाठा असलेल्या ठिकाणी रविवारी (ता.३) छापा टाकला. (Illegal storage of sand in Sakegaon Shivar is seized jalgaon crime news)

त्या ठिकाणी डंपर (क्रमांक जीजे १८, एयू ७४०४) आढळून आले. डंपर तपासले असता त्यात अंदाजे दोन ब्रास वाळू दिसून आली. पथकाचे वाहन पाहताच वाहनचालक व मजुरांनी तेथून पळ काढला.

काही वेळाने वाहनचालक वाहनाजवळ येऊन वाहन मालकी हक्काबाबत माहिती दिली. हे डंपर गोलू सोनार (रा. भुसावळ) यांचे मालकीचे असल्याचे सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

A team of the revenue department while taking action in the case of illegal sand stock.
Crime News : काँग्रेस कार्यकर्त्याच्या घरी चोरी! मोलकरीणच करत होती 9 महिने....

जप्त केलेले डंपर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे.

या कार्यवाहीमध्ये भुसावळ मंडळ अधिकारी प्रफुल्ल कांबळे, भुसावळ तलाठी पवन नवगाळे, तलाठी वराडसीम नितीन केले, वाहनचालक विलास नारखेडे, कोतवाल साकेगाव जितेश चौधरी, पोलिस पाटील साकेगाव गणेश भोई व तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी होते.

A team of the revenue department while taking action in the case of illegal sand stock.
Jalgaon Bribe Crime : अनुदानाची रक्कम प्राप्त करून देण्याच्या मोबदल्यात लाच घेताना दोघांना अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.