Jalgaon Crime News : अमळनेर खुनांच्या घटनांनी हादरले...! आंदोलकांचा ठिय्या

Murder
Murdersakal
Updated on

Jalgaon Crime News : तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये आपसांतील वादातून दोन तरुणांचा खून झाला. दरम्यान, २४ तासांच्या आत रात्रभर फिरून दोन्ही गुन्ह्यातील सहा संशयिताना पोलिसांनी अटक केली आहे. या खळबळजनक घटनांमुळे अमळनेर शहर हादरले. (In 2 separate incidents 2 youths were killed due to dispute between them jalgaon crime news)

सावखेडा येथे नाना मंगलसिंग बारेला (वय २१) याने डेबूजी सुरसिंग बारेला (वय २१, मूळ रा. किरमोहा, ता.सेंधवा, मध्यप्रदेश) याला सोमवारी (ता. २४) सायंकाळी काठीने मारहाण केली होती. त्याचा राग मनात ठेवून डेबूजी याने मंगळवारी (ता. २५) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास कुऱ्हाडीने नाना बारेला याच्या डोक्यात वार करून जागीच ठार केले.

नाना जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला होता आणि तशीच रक्ताने माखलेली कुऱ्हाड घेऊन गावातील दिनेश संतोष पाटील याला माहिती दिली. घटनेची माहिती प्रभारी पोलिस निरीक्षक वाकोडे यांना कळवताच त्यांनी उपनिरीक्षक नरसिंग वाघ, पोलिस कर्मचारी सुनील जाधव, राहुल पाटील यांना सावखेडा रवाना केल्याने पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या संशयित डेबूजी बारेला याला ताब्यात घेण्यात आले. दिनेश पाटील यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक नरसिंग वाघ तपास करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत दाजीबानगर भागात राहुल नाना सरोदे, रोहित चेतन सरोदे, कृष्णा सरोदे, अर्जुन पारधी हे घरच्या गच्चीवर जोरात गाणे वाजवत होते. त्यांना दीपक राजू भिल बोलायला गेला असता ते दीपकला मारहाण करू लागले. दीपकने घरी येऊन अक्षय भिल याला घटना सांगितली असता अक्षय जाब विचारायला गेला.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Murder
Jalgaon Crime News : मुंबईत ईद साजरी करणे पडले महागात; टीव्हीसह दागिने लंपास

त्यावेळी रोहित चेतन सरोदे याने अक्षय राजू भिल (वय २२) याला पोटात चाकू मारला तर दीपकला रोहितच्या आई नीताने बांबू मारला तर राहुलच्या आई आरतीने लोखंडी रॉड मारून जखमी केले. त्याला धुळे येथे उपचारासाठी रवाना केले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. त्याचा भाऊ गंभीर जखमी आहे. दरम्यान दोन महिन्यांपूर्वी दोघांच्या एकमेकांविरुद्ध पोलिसात तक्रारी दाखल झाल्या होत्या.

दरम्यान, मारहाण करणारे संशयित रोहित चेतन सरोदे (वय १९), राहुल नाना सरोदे (वय २३), अर्जुन नाना सरोदे (वय २५), नीता चेतन सरोदे (वय ४५) यांना अक्षय मयत झाल्याचे कळताच ते धुळ्याला पळून गेले होते. प्रभारी पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या आदेशाने सहाय्यक निरीक्षक राकेशसिंग परदेशी, उपनिरीक्षक अनिल भुसारे, उपनिरीक्षक अक्षदा इंगळे, शरद पाटील, रवी पाटील, दीपक माळी, सूर्यकांत साळुंखे, सिद्धांत शिसोदे यांनी धुळ्यात चितोडगड परिसरात संशयित असल्याची माहिती घेऊन त्यांना तेथून ताब्यात घेतले.

तर दुसरी संशयित आरती नाना सरोदे (वय ४८) ही महिला अमळनेरात असल्याची माहिती मिळताच उपनिरीक्षक अक्षदा इंगळे, सुनील हटकर, कपिल पाटील यांनी तिला पकडून आणले. उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव यांनी आरोपींची कसून चौकशी सुरू केली आहे.

Murder
Jalgaon Crime News : भाच्यांना भेटायला आलेल्या मामाला मारहाण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.