Jalgaon News : अल निनोच्या प्रभावामुळे यंदाचा उन्हाळा कडक गेला. पाउसही लांबला. जून महिना संपत असतानाही मॉन्सूनचे आगमन नाही. अशा परिस्थितीत कोरडवाहू शेतकऱ्यांच्या पेरण्या रखडल्या आहेत.
बागायतदार शेतकऱ्यांनी साठ टक्क्यांवर पेरण्या केल्या. मात्र, अजून काही दिवस पाऊस आला नाही तर? अशी भिती त्यांना आहे. मॉन्सून लांबल्याने कोरडवाहू शेतकरी दहा टक्के पेरण्या कमी करतील, असे चित्र सध्या आहे.
दरम्यान, या हंगामात कापसाचे दर सात हजारांच्या वरच राहतील, असा अंदाज कापूस अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. (In cotton field There will be a ten percent reduction rate will remain close to seven thousand Horticulture sowing at 60 percent Jalgaon news)
मॉन्सून लांबल्याने कृषी क्षेत्रात मोठा विपरीत परिणाम होणार असल्याचे चित्र आहे. एव्हाना पेरण्यांना सुरवात होणे अपेक्षीत होते. मात्र, मॉन्सूनच नाही, तर बी पेरणार कसे? असा प्रश्न शेतकऱ्यांना आहे.
मागील (२०२२) हंगामातील अजून वीस ते तीस टक्के कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. यंदा अजून पाउस झालेला नाही. केव्हा येईल याचा भरवसा नाही. यामुळे शेतकऱ्यांचे डोळे आता आकाशाकडे लागलेले आहेत. २०२१ ला कापूस टंचाईमुळे कापसाला दहा ते तेरा हजारांचा दर मिळाला होता.
तोच दर २०२२ मध्येही मिळायला हवा अशी मागणी शेतकऱ्यांची होती. मात्र हंगाम संपला तरी कापसाला अपेक्षीत दर मिळाला नाही. यामुळे गत हंगामातील शेतकऱ्यांचा तीस टक्के कापूस अद्याप पडून आहे. केंद्र शासनाने ६ हजार ६८० ते ७ हजार असा हमीभाव कापसाला (ताग्यानूसार) जाहीर केला.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
"पाउस लांबला असला तरी बागायतदार शेतकऱ्यांनी ९० टक्के पेरण्या केल्या आहेत. कोरडवाहू शेतकऱ्यांच्या पेरण्या बाकी आहेत. त्या दहा टक्के कमी होतील. ‘सीसीआय’ कापूस खरेदीसाठी उतरण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय मागणीवर खुल्या बाजारातील कापसाच्या दर अवलंबून असतील. ते आताच सांगणे कठीण आहे."
-प्रदीप जैन, अध्यक्ष, खानदेश जिनिंग प्रेसिंग मिल असोसिएशन
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.