Jalgaon News : जिल्ह्यात अजूनही 67.73 टक्के शेतकऱ्यांचा पीकपेरा बाकी; ई-पीक पाहणीचे App या लिंकवरुन करा Download

Crop insurance scheme
Crop insurance schemeesakal
Updated on

Jalgaon News : राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी १ रुपयात पीकविमा योजना राबविली आहे. नुकसानभरपाई मिळण्यासाठी पीकपेरा बंधनकारक आहे. जिल्ह्यात सहा लाख ९६ हजार ६१८ खातेदार शेतकरी आहेत.

यापैकी दोन लाख दोन हजार ७१० म्हणजेच ३२.२७ टक्के शेतकऱ्यांनी पीकपेरा नोंदविलेला असून, उर्वरित ६७.७३ टक्के शेतकऱ्यांनी अद्याप पीकपेरा नोंदविला नसल्याने ई-पीक पाहणीसाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. (In district 67 73 percent of farmers are yet to sow their crops jalgaon news)

शेतकऱ्यांनी मुदतीत ई-पीक पाहणी करून घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. शेतकऱ्यांना आपल्या शेतात पीक पाहणी या मोबाईल ॲपद्वारे पीकपेरा नोंदविता येतो. यासाठी शेतकऱ्यांना शेतातील विविध पिकांची आपल्या सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत होती.

मात्र, मागील काही दिवसांपासून सर्व्हर डाउन असल्याने अनेक शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करता आली नाही. यामुळे आता १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे पीकविम्यासाठी असलेली ई-पीक पाहणी शेतकऱ्यांना पूर्ण करता येणार आहे. पीक शेतात आहे की नाही, याची पडताळणी करण्यासाठी ई-पीक पाहणी करणे गरजेचे आहे.

पण, ही पाहणी करताना ई-पीक पाहणीचे सर्व्हर डाउन असणे, अपलोड न होणे, अंतिम अहवाल न येणे अशा अडचणी येत होत्या. यामुळे अनेक शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करता आली नसल्याच्या तक्रारी होत होत्या.

.हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Crop insurance scheme
Jalgaon News : शेताच्या तारकुंपणात वीज सोडल्याने तरुणाचा मृत्यू; नशिराबाद ग्रामस्थांचा दांगडो

या वर्षी शासनाने १ रुपयात पीकविमा उपलब्ध करून दिल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विमा भरला आहे. आता विम्याचा लाभ मिळण्यासाठी जे पीकविमा करताना नोंदविले आहे, त्यांना पिकाची ई-पीक पाहणीमध्ये नोंद होणे गरजेचे आहे.

पीक पाहणी नोंदणी पूर्ण करून घ्यावी व शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. जेणेकरून शेतकऱ्यांना पीकविमा, पीककर्ज, शासकीय अनुदान, अतिवृष्टी अनुदान आदी विविध योजनांचा लाभ घेण्यास मदत होणार आहे.

दरम्यान, खरिप हंगाम २०२३ ई- पीक पाहणी नोंदणीसाठी ई-पीक पाहणीचे २.०.११ हे अपडेटेड व्हर्जन गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. सर्व खातेदार शेतकऱ्यांनी नवीन व्हर्जन अपडेट करून घेणे आवश्यक आहे. ‌https://play.google.com/store/apps/details?id=io.sc.eppCordova या लिंकद्वारेही नवीन व्हर्जन- २ डाउनलोड करता येईल

Crop insurance scheme
Sakal Exclusive : वाळूमाफियांचे ‘नेटवर्क लय भारी’! वाळूचोरांचा महाराष्ट्रासह गुजरात सरकारलाही चुना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.