Gold Purchase : दिवाळीच्या पर्वात 1 हजार कोटींचा बुस्ट! 130 किलो सोन्याची विक्री

Gold Purchase : दिवाळीच्या पर्वात 1 हजार कोटींचा बुस्ट! 130 किलो सोन्याची विक्री
Updated on

Gold Purchase : यंदा दिवाळीचे पर्व सोने, वाहन बाजार, रिअल इस्टेटसह कपडा मार्केटसह इतर व्यावसायिकांसाठी चांगले होते. दिवाळीपूर्वी व नंतरही सर्वच बाजारपेठांतही आजही खरेदीसाठी झुंबड पहावयास मिळत आहे. सर्वच व्यवसायातील उलाढालीने बाजारपेठेला सुमारे एक हजार कोटींचा ‘बुस्ट’ मिळाला असल्याचे चित्र आहे.

धनत्रयोदशीपासून सोने, वाहन खरेदी जोरात सुरू झाली. दिवाळी (लक्ष्मीपूजन), नंतर पाडवा, भाउबीजेने त्यात गोडवा भरला. सोने, चांदी, वाहन, गृहपयोगी वस्तू खरेदी करून दिवाळीचा गोडवा नागरिकांनी वाढविला आहे. (In Diwali Selling 130 kg of gold jalgaon news)

सोने खरेदीसाठी शहरातील नामांकित रतनलाल सी बाफना, नवलखा ज्वेलर्स, भंगाळे गोल्ड या शोरूममध्ये नागरिकांनी सोने, चांदीचे दागिने खरेदीसाठी गर्दी केली होती. दुचाकी, चारचाकी, ई-बाईक्सच्या मार्केटला चांगली गती मिळाली. स्मार्ट टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशिन, स्मार्टफोन खरेदीची दसऱ्यापेक्षा अधिक वाढली आहे.

दिवाळी बोनसचे बळ

दिवाळीमध्ये पगार, बोनस मिळाल्याने या नियोजनाला अधिक बळ मिळाले. त्यानुसार दिवाळी सणातील वसुबारस पहिल्या दिवसापासून खरेदी सुरू झाली आणि ती भाऊबीजेच्या दिवसांपर्यंत सुरू राहिली. कॅशबॅक, लकी ड्रॉ, भेटवस्तू, सहल, बक्षीसे अशा विविध सवलत योजनांचा लाभ घेत नागरिकांनी खरेदीचा आनंद लुटला. बांधकाम क्षेत्रात चांगली उलाढाल झाली. या वर्षी दिवाळीत बांधकाम क्षेत्रात चांगली उलाढाल झाली.

फ्लॅट, दुकाने यांना चांगली मागणी होती. फ्रिज, स्मार्ट टीव्ही खरेदीला गर्दी तीस टक्क्यांनी उलाढाल जास्त झाली. तुळशी विवाहानंतर लग्नसराईचा हंगाम सुरू होतो. त्याची तयारी म्हणून अनेकांनी साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सोने, चांदी खरेदी केली. दरम्यान, सोने-चांदीच्या दागिन्यांसह हिऱ्याचे दागिने खरेदीला ग्राहकांची चांगली पसंती होती.

खरेदीला प्रतिसाद

गणेशोत्सवापासून बाजारपेठेचे अर्थचक्र फिरण्यास सुरवात झाली. विजयादशमीला त्याला गती मिळाली आणि दिवाळीमध्ये ती अधिक वाढली. दिवाळीच्या तयारीपासून विविध स्वरूपातील खरेदीला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. गृहपयोगी वस्तूंच्या खरेदीला ग्राहकांनी शहर आणि उपनगरातील शोरूम, दुकानांमध्ये गर्दी केली. अनेकांनी स्मार्ट फोन, लॅपटॉपही खरेदी केले.

Gold Purchase : दिवाळीच्या पर्वात 1 हजार कोटींचा बुस्ट! 130 किलो सोन्याची विक्री
Gold Purchase : सोनं खरेदी करायचंय? मग ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी आहे

दुचाकी, चारचाकीचा 'टॉप गिअर'

वाहनक्षेत्रात या वर्षी चांगली उलाढाल झाली, चारचाकी, दुचाकी, ई-व्हेइकल्समध्ये ते अधिक प्रमाणात जाणवले. व्यावसायिक वाहनांबाबतचे चांगले चित्र असल्याची माहिती आटोमोबाईल क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली.

"दिवाळीच्या पर्वात सोन्याची विक्री गतवर्षी पेक्षा तीस टक्क्यांनी अधिक वाढली. पेशवाई, इटालियन, कास्टिंग, रोज गोल्ड, आदी दागिन्यांना ग्राहकांची पसंती अधिक होती. दसऱ्यापेक्षा ३० टक्क्यांनी उलाढाल दिवाळीत वाढली आहे. आता लागलीच लग्नसराई सुरू होईल. आगामी काळात सोन्याला अधिक मागणी राहील." - आदित्य नवलखा, संचालक नवलखा ज्वेलर्स

"दिवाळी म्हणजे सोने खरेदी असे समीकरण आहे. शहरातील नव्हे तर ग्रामीण भागातील नागरिकांनी दिवाळीच्या पर्वात सोने खरेदीस चांगला प्रतिसाद दिला. आताही गर्दी सुरू आहे." - मनोहर पाटील, व्यवस्थापक रतनलाल सी बाफना ज्वेलर्स

सोन्यात हजारांची तर चांदीत चार हजारांची वाढ

गेल्या दोन दिवसात सोन्याच्या दरात एक हजारांची वाढ झाली आहे. मंगळवारी (ता.१४) सोने ६० हजार ३०० प्रतितोळा (१० ग्रॅम) होते. ते आज ६१ हजार ३०० प्रतितोळा आहे. मंगळवारी चांदी ७१ हजार प्रतिकिलो होती. त्यात चार हजारांची वाढ होवून, ती आज ७५ हजार प्रती किलो (विना जीएसटी) पोचली आहे.

Gold Purchase : दिवाळीच्या पर्वात 1 हजार कोटींचा बुस्ट! 130 किलो सोन्याची विक्री
Gold Rate Today: दिवाळीनंतर सोन्या-चांदीच्या भावात वाढ; लग्नसराईत आणखी भाव वाढण्याची शक्यता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.