जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधितांबरोबरच मृत्युसंख्येही घट

दुसऱ्या लाटेत सर्वाधिक मृत्यू एप्रिलमध्ये; सध्याचा मृत्युदर १.८० टक्का
 corona patients
corona patients sakal media
Updated on

जळगाव : जिल्ह्यात कोरोना महामारी मार्च २०२० मध्ये झाली. सुमारे दीड वर्षाच्या कालावधीत अडीच हजारांवर बाधितांचा मृत्यू झाला. सर्वाधिक मृत्यू दुसऱ्या लाटेत एप्रिल २०२१ मध्ये ५५९ एवढे झाले. कोरोनाची पहिली व दुसरी लाट येऊन गेली. पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट घातक ठरली. सर्वाधिक मृत्यू या लाटेत झाले. असे असले तरी गेल्या जुलै महिन्यापासून कोरोनाबाधितांची संख्या घटली आहे. त्याबरोबरच कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्याही घटली आहे. दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची सर्वाधिक गरज बाधितांना लागली. यामुळे जिल्ह्यात सर्वच तालुकास्तरावर ऑक्सिजन प्लांटची निर्मिती सुरू झाली आहे.

कोरोनावर उपाययोजना म्हणून मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, गर्दीपासून लांब राहणे अशा नियमांचे पालन होत असल्याने जिल्ह्यातील बाधितांची संख्या कमी झाली. तिसरी लाट डिसेंबरअखेर येण्याची चिन्हे आहेत. ती येऊ नये, आली तर तिचा नागरिकांच्या आरेाग्यावर परिणाम होऊ नये म्हणून सर्वांनीच कोरोना लशीचा पहिला व दुसरा डोस घेणे गरजेचे आहे. यामुळे जरी आपण बाधितांच्या संपर्कात आलो तरी लाटेपासून स्वतःला वाचवू शकू.

 corona patients
कोविड काळात वाढली चिंता; 25 टक्के मुंबईकर नैराश्यात

राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार ऑगस्टमध्ये राज्याचा मृत्युदर १.६५ होता. तो आता कमी होऊन १ ते १२ ऑक्टोबरदरम्यान १.१६ टक्क्यावर पोचला आहे. याचा अर्थ राज्यात फक्त रुग्णसंख्याच कमी झालेली नाही तर मृत्युदरातही घट झाली आहे.

२०२१ च्या एप्रिल महिन्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळले. मृत्यूचे प्रमाणही जास्त होते. मात्र, गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत ऑक्टोबरच्या सुरवातीला मृत्युदरामध्ये घट नोंदविण्यात आली आहे. फेब्रुवारीआधी दररोज चार हजार ६९० रुग्ण सापडत होते. तेव्हा एक हजार ४६४ मृत्यू नोंदविण्यात आले. मात्र, आता सरासरी दोन हजार ४७४ रुग्ण आणि ३४३ मृत्यू नोंदले जात आहेत.

मृत्युदर आता १.४६ टक्का नोंदविण्यात आला आहे. जुलैमध्ये तीन हजार ९४९ मृत्यू नोंदविण्यात आले होते. मृत्युदर १.६५ होता. ऑगस्टमध्ये तो वाढून १.८० टक्क्यावर पोचला. त्यानंतर सप्टेंबरमध्ये मृत्युदर १.४६ पर्यंत खाली आला. आता मृत्युदर आणि रुग्णसंख्याही कमी झाली आहे. राज्यात दररोज सरासरी दोन हजार ४७४ रुग्ण सापडत असून, ३४६ मृत्यू होत आहेत. जुलै महिन्यापासून मृत्यूमध्ये घट नोंदली गेली आहे. आता तीनअंकी मृत्यू राज्यात नोंदले जात आहेत.

जळगाव जिल्ह्याची स्थिती

  • जानेवारी २०२१ २७

  • फेब्रुवारी २९

  • मार्च २४०

  • एप्रिल ५५९

  • मे ३४८

  • जून ३८

  • जुलै ५

  • ऑगस्ट ०

  • सप्टेंबर ०

  • ऑक्टोबर ३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.