जळगाव : हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या मुख्य रक्तवाहिनीत ब्लॉक आल्याने तसेच अन्य रक्तवाहिन्यांच्या मुखाशीच ब्लॉक आढळलेल्या ५२ वर्षीय रुग्ण महिलेला डबल हार्टअटॅक आला... त्याचवेळी सुरु असलेल्या आरोग्य शिबिरातून रुग्णाला थेट डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील हृदयालयात आणून तातडीने एन्जीओप्लास्टी करत जीवनदान देण्यात डॉक्टरांना यश आले.
महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत रुग्णावर मोफत उपचार करण्यात आले. खामगाव तालुक्यातील वाडी येथील रहिवासी सविता प्रकाश दामोदर (वय ५२) यांना काही दिवसांपासून छातीत दुखत होते. खामगाव येथे आयोजित आरोग्य शिबिरात रुग्ण महिला आली, यावेळी हृदयविकार तज्ज्ञांना रुग्णाचे लक्षण हे हार्टअटॅक असल्याचे दिसून आले. तत्काळ ईसीजी व टूडी इको तपासणी करण्यात आली. औषधोपचार करत पुढील उपचारासाठी रुग्णाला डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात हलविण्यात आले.
डीएम कार्डियोलॉजिस्ट डॉ. वैभव पाटील व डॉ. प्रदीप देवकाते यांची याठिकाणी ‘गोल्डन अवर्स’मध्ये तातडीची सेवा सुरु असते. श्रीमती दामोदर यांची प्रकृती पाहता नातेवाइकांच्या संमतीने तातडीने हृदयविकार तज्ज्ञ डॉ. प्रदीप देवकाते यांनी एन्जीओप्लास्टी केली. काही वेळातच रुग्णाची प्रकृती स्थिर होऊन पंपिंग रेटही वाढला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.