Jalgaon Crime : आदिशक्ती संत मुक्ताईच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या संत भूमी मुक्ताईनगरीत गेल्या काही दिवसांपासून भर रस्त्यावर मुलीची छेड काढणे, मुलींना फूस लावणे, अशा घटना सातत्याने घडत असून, येथील बसस्थानक टवाळखोरांचा अड्डा बनला आहे. शहरात डोके वर काढू पाहणाऱ्या या समस्येकडे पोलिसांनी वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.
शहरात गेल्या दोन आठवड्यात किरकोळ कारणावरून गँगवॉर शहरात होताना दिसून येत आहे. (In Muktainagar crime increasing jalgaon news)
विशेष मागील महिन्यात देखील विद्यार्थ्याला अभ्यासावरून हटकल्याने शिक्षकालाच मारहाण व यानंतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे संबंधितांवर व त्यानंतर आता पुन्हा आठ ते दहा टवाळखोर मुलांचा ग्रुप जमवून एखाद्याला एकांतात गाठून हाणामारीचे प्रकार होत आहेत.
बसस्थानक, प्रवर्तन चौक ते शाळा कॉलेज अशा परिसरात या गंभीर घटना होताना दिसू येत असून, अगदी मिशाही न फुटलेली ही गुंडगिरी डोके वर काढून भविष्यातील मोठ्या गुन्हेगारीचे चित्रच येथे डोळ्यासमोर उभी करताना दिसून येत असून, अशा शिक्षणाची कास सोडून विद्यार्थी दशेतील मुले गुन्हेगारीकडे वळत आहे.
तसेच आपला शोक पूर्ण करण्यासाठी काही मुले ग्रुपने महामार्गावर असलेल्या कोथळी बायपास पुलाखाली तसेच एकांतात बाहेर राज्यातील ट्रकचालक यांच्यावर दगडफेक करून धाक दाखवून पैसे लुटण्याचा प्रकार घडत आहे.
पोलिस प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. अशा विद्यार्थी दशेतील नवतरुणांकडे पालकांचे देखील दुर्लक्ष झाले आहे की काय? असा सवाल उपस्थित होत आहे. तरुणाई गुन्हेगारीकडे वळू नये, यासाठी राजकीय पुढाऱ्यांनी राजकीय द्वेष विसरुन एकत्रित येऊन गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी होत आहे.
टवाळखोरांवर हवी जरब
शहरात टवाळखोरांचा उपद्रव वाढला आहे. विशेषत: बसस्थानक परिसर, चौकांमध्ये रात्रीच्या वेळी टवाळखोरांकडून धुडगूस घातला जातो. परिसरातील नागरिकही त्रस्त झाले आहेत. या टवाळखोरांवर शहर पोलिसांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी सातत्याने होते आहे. रात्रीची गस्तीपथकांकडूनही मध्यरात्री टवाळक्या करणाऱ्यांवर कारवाई झाल्यास टवाळखोरी मोडीत निघण्यास मदत होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.