Raju Baviskar : राजू बाविस्कर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध चित्रकार असून, त्यांना चित्रकलेत भारतीय स्तरावरील अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांचे काळ्या-निळ्या रेषा हे आत्मकथन पुण्याच्या राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केले. (Inclusion of Raju Baviskar autobiography kalya nilya resha in MA syllabus jalgaon news)
जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संलग्नित प्रताप (स्वायत्त) महाविद्यालयातील (अमळनेर, जि. जळगाव) एम. ए. प्रथम वर्ष मराठीच्या मराठी आत्मकथन या अभ्यासक्रमात जळगाव येथील प्रसिद्ध चित्रकार तथा लेखक राजू बाविस्कर यांचे ‘काळ्या-निळ्या रेषा’ या आत्मकथनाचा शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून समावेश करण्यात आला. महाविद्यालयाच्या मराठी अभ्यास मंडळाने त्यांना तसे पत्र पाठविले आहे.
परिवर्तन जळगावने या आत्मकथनाचा प्रकाशन सोहळा ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे, जैन कंपनीचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त श्रीकांत देशमुख, सदानंद देशमुख, रंगकर्मी शंभू पाटील, कवी अशोक कोतवाल, कवी रमेश पवार, लेखक सत्यजित साळवे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत केला होता.
अल्पावधीत हे आत्मकथन वाचकप्रिय ठरले आहे. मराठी प्रांतात विविध दृष्टिकोनातून त्यावर चर्चा होते. या आत्मकथनाला मराठवाडा साहित्य परिषद, छत्रपती संभाजीनगर येथील यशवंतराव चव्हाण विशेष वाङ्मय पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे येथील लक्ष्मीबाई टिळक वाङ्मय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
काळ्या-निळ्या रेषा या आत्मकथनाचा एम.ए.च्या अभ्यासक्रमात समावेश झाल्याबद्दल अशोकभाऊ जैन, रंगकर्मी पाटील, कवी कोतवाल, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त देशमुख, प्रताप महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख डॉ. रमेश माने, निवृत्त प्राचार्य राजेंद्र महाजन, चित्रकार विकास मल्हारा, चित्रकार विजय जैन, नाट्यकर्मी हर्षल पाटील आदींनी अभिनंदन केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.