Online Payement Security : शहरासह जिल्ह्यात अनेकांना ऑनलाइन पेमेंट टाकण्याचे आमिष दाखवून क्यूआर कोड, ओटीपी विचारून त्यांचा ‘जांगडगुत्ता’ करून लाखो रुपयांचे पेमेंट अकाउंटमधून परस्पर काढण्याचे प्रकार वाढले आहेत. (increase in cases of mutual withdrawal of lakhs of rupees from online payment fraud jalgaon crime news)
पेमेंट ॲपचा वापर करून आनलाइन व्यवहार करीत असाल, तर वेळीच सावधान होण्याची गरज असल्याचा सल्ला पोलिसांनी दिला आहे. या ॲपचा वापर करता का, असा प्रश्न करीत नवीन नेव्हिगेशन बघा, असे सांगत ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांत वाढ झाली आहे.
आतापर्यंत वकील, डॉक्टर, व्यापारी, विद्यार्थ्यांना विविध कारणे सांगत ओटीपी विचारत गंडविले आहे. नुकतेच एका पत्रकाराला क्रेडिट कार्डची लिमिट ३५ हजारांवरून ७० हजार करून देतो, असे सांगत कार्डचा क्रमांक मागितला. नंतर ओटीपी मागितला. दुसऱ्याच क्षणी पत्रकाराच्या खात्यातून ३४ हजार गेल्याचा मेसेज आला. याबाबत पत्रकाराने पोलिसांत तक्रार दिली.
ऑनलाइन पेमेंट करताना गंडविल्याचे प्रकार ऐकूनही अनेक जण पुन्हा पुन्हा ती चूक करून गंडविले जात आहेत. काही जण तक्रारी करतात, काही जण समाजात ‘याचे पैसे गेले, म्हणून हसे हाईल’, असा विचार करून तक्रारही करीत नाही. डिजिटल पेमेंटची सुविधा जितकी सोयीची आहे तितकीच धोकादायकही आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
अशा ॲपचा वापर करणाऱ्यांची वारंवार फसवणूक होत असल्याच्या घटना घडत आहे. ग्राहकांनी सतर्क होण्याची गरज आहे. घरबसल्या सर्व व्यवहार केले जात असल्याने ग्राहकांचा या सेवांकडे अधिक कल आहे. ‘गुगल पे’, ‘पेटीएम’, ‘फोन पे’ यासारख्या ॲपच्या माध्यमातून डिजिटल पेमेंट सहज होते. ते सुरक्षित असले, तरी ते ॲप वापरताना योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे.
...अशी होत फसवणूक
मोबाईल स्पॅम लिंक टेक्स्ट मेसेजवर पाठविल्या जातात. अथवा फोन करून लिंकवर क्लिक करायला सांगितले जाते. यात विविध आफर्स दिल्या जातात. यातून ग्राहकांना आकर्षित केले जाते. ग्राहक येथेच फसतो. लिंकवर क्लिक केल्यानंतर एकदा ॲप डाउनलोड होते. डिटेल्स दिल्यानंतर काही वेळताच ग्राहकांच्या खात्यातून पैसे काढले जातात.
कोणत्याही प्रकारे उत्तरे देऊ नका
ग्राहकांना सायबर गुन्हेगारांनी टार्गेट करीत त्यांना पेमेंट ॲप वापरता का, अशी विचारणा केली जाते. साहजिकच होकारार्थी उत्तर दिले जाते. समोरील व्यक्ती नवीन नेव्हिगेशन आले आहे, ते उघडा, असे सांगितले जाते. ते उघडल्यास खात्यातून काही वेळातच पैसे काढले जातात.
...अशी घ्या काळजी
- गुगलवरून मिळविलेला कस्टमर केअर क्रमांक हॅकरचा असू शकतो. त्यासाठी अधिकृत ॲपवरूनच क्रमांक मिळवा
- कोणत्याही कंपनीचा कस्टमर केअर क्रमांक १८०० असा असतो. तसा नसल्यास तत्काळ सावध व्हावे
- लॉगीन सिक्युरिटी कोड, ओटीपी दुसऱ्याला शेअर करू नका
- लॉगऑन व लॉगइन हे कोडवर्ड, तसेच पिनकोड वारंवार बदलावा. तो दुसऱ्याला देऊ नये
- एखाद्या पेमेंट ॲपवरून पाठविलेली रक्कम न पोचल्यास घाबरून अन्य मार्गांचा शोध घेऊ नका
"आपल्या बँक खात्याची, मोबाईल वॉलेटची माहिती अनोळखी व्यक्तीला देऊ नका. वॉलेट ॲपमध्ये सिक्युरिटीचा पर्याय निवडा. ऑनलाइन खरेदी करताना लगेच पेमेंट करायला सांगितले जात असेल, तर सतर्क राहा. पैसे पाठविण्यापूर्वी संबंधित व्यक्तीचा खाते नंबर खात्री करून घ्या. फसवणूक झाल्यास सायबर पोलिसांकडे तक्रार करावी." -अशोक उतेकर, पोलिस निरीक्षक, सायबर क्राइम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.